पिंपरीत शालेय विद्यार्थ्यांच्या गणवेश खरेदीच्या निविदा न मागविता थेट खरेदीचा ठराव

By ऑनलाइन लोकमत | Published: March 12, 2020 04:08 PM2020-03-12T16:08:43+5:302020-03-12T16:09:12+5:30

विद्यार्थ्यांची कोणतीही गैरसोय होऊ नये आणि १५ जून २०२० रोजी साहित्य पुरविणे आवश्यक आहे हे कारण पुढे

Direct purchase resolution without the tender of buying uniforms of school students in Pimpri | पिंपरीत शालेय विद्यार्थ्यांच्या गणवेश खरेदीच्या निविदा न मागविता थेट खरेदीचा ठराव

पिंपरीत शालेय विद्यार्थ्यांच्या गणवेश खरेदीच्या निविदा न मागविता थेट खरेदीचा ठराव

googlenewsNext
ठळक मुद्दे प्रति विद्यार्थी - विद्याथिंर्नींना दोन शालेय विद्यार्थी गणवेश आणि दोन पीटी गणवेश

पिंपरी : महापालिकेच्या प्राथमिक शाळेतील बालवाडी ते आठवी आणि माध्यमिक शाळेत शिकणाऱ्या सुमारे ५० हजार विद्यार्थ्यांना प्रत्येकी दोन शालेय गणवेश तर दोन पीटी गणवेश मिळणार आहे.  निविदा प्रक्रिया न राबविता थेट पद्धतीने खरेदी करा, अमुकतमुक ठेकेदाराकडूनच गणवेश खरेदी करा, असा ठराव स्थायी समितीने सवार्नुमते संमत केला आहे.  
पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या माध्यमिक शाळेतील अंदाजे ८ हजार ३५४ विद्यार्थी - विद्यार्थिनींना आणि प्राथमिक शाळेतील बालवाडी ते आठवीतील विद्यार्थी - विद्यार्थिनींना शालेय पटानुसार, प्रति विद्यार्थी - विद्याथिंर्नींना दोन शालेय विद्यार्थी गणवेश आणि दोन पीटी गणवेश वाकड येथील श्री महालक्ष्मी ड्रेसेस अँड टेलरींग फर्म यांच्याकडून खरेदी करण्यात येणार आहेत. तसेच प्रति विद्यार्थी - विद्यार्थिनींना एक स्वेटर श्री वैष्णवी महिला कॉपोर्रेशन यांच्याकडून खरेदी करण्यात येणार आहेत.   दरवर्षीप्रमाणे ही साहित्य खरेदी करताना विद्यार्थ्यांची कोणतीही गैरसोय होऊ नये तसेच हे साहित्य शाळा सुरू होताना म्हणजेच १५ जून २०२० रोजी पुरविणे आवश्यक आहे, हे कारण पुढे करत निविदा प्रक्रीया न राबविता थेट पद्धतीने हे साहित्य खरेदी करण्याचा घाट स्थायी समितीने घातला आहे. त्यासाठी यापूर्वी प्रसिद्ध केलेल्या निविदा अटी व शर्तीनुसार नव्याने निविदा न मागविता श्री महालक्ष्मी ड्रेसेस आणि वैष्णवी महिला कॉपोर्रेशन या पुरवठादारांकडूनच हे साहित्य खरेदी करण्यात येणार आहे. कोणत्याही प्रकारची दरवाढ न करता मागील वर्षाच्या लघुत्तम दराने सन २०२०-२१ या वषासार्ठी यापूर्वी केलेल्या करारनाम्यानुसार, पुरवठा आदेश देऊन साहित्य खरेदी केले जाणार आहे. महापालिकेचे आर्थिक नुकसान होणार नाही तसेच विद्यार्थ्यांचेही शैक्षणिक नुकसान होणार नाही, अशा रितीने कायदेशीर बाबी तपसून प्रशासनाने निर्णय घेण्यास मान्यता द्यावी, अशी उपसुचना देत या ऐनवेळच्या विषयाला स्थायी समिती सभेत मंजुरी दिली आहे.

Web Title: Direct purchase resolution without the tender of buying uniforms of school students in Pimpri

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.