Pooja Khedkar Case: पूजा खेडकरला दिले अपंगत्वाचे प्रमाणपत्र; पिंपरीतील वायसीएम रुग्णालयाचे अधिष्ठाता अडचणीत!

By विश्वास मोरे | Published: August 30, 2024 02:57 PM2024-08-30T14:57:15+5:302024-08-30T14:57:32+5:30

पिंपरी पालिकेच्या वायसीएम रुग्णालयासह डॉक्टर वाबळेंची स्वतंत्र चौकशी करावी, असं थेट वैद्यकीय शिक्षण प्रधान सचिवांसह राज्य सरकारच्या संबंधित विभागांना कळवलं

Disability certificate issued to Pooja Khedkar Founder of YCM Hospital in Pimpri in trouble! | Pooja Khedkar Case: पूजा खेडकरला दिले अपंगत्वाचे प्रमाणपत्र; पिंपरीतील वायसीएम रुग्णालयाचे अधिष्ठाता अडचणीत!

Pooja Khedkar Case: पूजा खेडकरला दिले अपंगत्वाचे प्रमाणपत्र; पिंपरीतील वायसीएम रुग्णालयाचे अधिष्ठाता अडचणीत!

पिंपरी: वायसीएम रुग्णालयाने प्रशिक्षणार्थी आयएएस पूजा खेडकरला डाव्या गुडघ्यात सात टक्के कायमस्वरूपी अधू असल्याचे अपंगत्वाचे प्रमाणपत्र दिले होते. मात्र, या प्रमाणपत्राबाबत शंका उपस्थित करत दिव्यांग कल्याण आयुक्तालयाने चौकशी करण्याचे आदेश दिले होते. त्यामुळे रुग्णालयाचे अधिष्ठाता डॉ. राजेश वाबळे अडचणीत येणार आत. हे. पिंपरी पालिकेच्या वायसीएम रुग्णालयासह डॉक्टर वाबळेंची स्वतंत्र चौकशी करावी, असं थेट वैद्यकीय शिक्षण प्रधान सचिवांसह राज्य सरकारच्या संबंधित विभागांना कळवलं आहे.

पिंपरीतील वायसीएमने पूजा खेडकरला डाव्या गुडघ्यात सात टक्के कायमस्वरूपी आधु असल्याचं अपंगत्वाचे प्रमाणपत्र दिले होते. मात्र या प्रमाणपत्राबाबत शंका उपस्थित करत दिव्यांग कल्याण आयुक्तालयाने चौकशी करण्याचे आदेश दिले होते. या अनुषंगाने  कागदपत्रे समोर आणत, पूजाला दिलेल्या अपंगत्व प्रमाणपत्रासह चौकशी अहवालाबाबत ही अनेक प्रश्न उपस्थित केले होते. त्यालाच अनुसरून दिव्यांग कल्याण आयुक्तालयाने डॉ राजेंद्र वाबळेंचा चौकशी अहवाल फेटाळला आहे. 

ज्यांच्या सहीने पूजाला अपंगत्वाचे प्रमाणपत्र दिले. त्या वाबळेंनी ही चौकशी कशी काय केली? हे योग्य आहे का? शिवाय अपंगत्व ठरविण्यासाठी तपासण्यात आलेल्या एमआरआय रिपोर्टवर ही दिव्यांग आयुक्तालयाने शंका उपस्थित करत, डॉ.  वाबळेंचा चौकशी अहवाल फेटाळला आहे. त्यामुळे वाबळे यांच्यासह प्रमाणपत्र देणारेही चौकशीच्या फेऱ्यात सापडणार आहेत.

Web Title: Disability certificate issued to Pooja Khedkar Founder of YCM Hospital in Pimpri in trouble!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.