भातबीजातील भेसळीने झाले नुकसान
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 13, 2018 12:08 AM2018-11-13T00:08:08+5:302018-11-13T00:08:26+5:30
वाघेश्वर : शेतकऱ्याने केली कृषी अधिकाºयांकडे तक्रार; भरपाईची मागणी
पवनानगर : शासनाच्या कृषी विद्यापीठातून घेतलेल्या भातबीजातून भेसळ झाली असल्याची तक्रार वाघेश्वर येथील शेतकºयाने कृषी अधिकाºयाकडे केली आहे. याबाबत शासनाने नुकसानभरपाई द्यावी, अशी मागणी त्यांनी केली आहे. शेतकरी दत्तू झिरमा कडू यांनी तक्रारअर्ज दाखल केला आहे. लोणावळा येथील शासनाच्या महात्मा फुले कृषी विद्यापीठाच्या अधिकृत विक्रेत्याकडून दि. २१/०५/२०१८ रोजी ६० किलो प्रमाणित इंद्रायणी भातबियाणे खरेदी केले होते. परंतु बियाणे पेरणीनंतर भाताचे वेगळेच भात पिकाची उगवण झाल्यावर भाताला कोणत्याच प्रकारचे दाणे आले नाहीत. यामध्ये कडू यांचे दोन एकर क्षेत्रातील भाताचे नुकसान झाले आहे. परंतु लोणावळा येथील कार्यालयात तक्रारीदरम्यान उडवाउडवीची उत्तरे दिली, असे कडू यांनी सांगितले.
दरम्यान, संत तुकाराम सहकारी साखर कारखान्याचे संचालक पांडुरंग ठाकर यांनी भाताची पाहणी केली. नुकसानभरपाईसाठी पाठपुरावा करणार असल्याचे सांगितले. दरम्यान नुकसान झाल्याने शेतकरी हवालदिल झाला आहे. त्याला नुकसान भरपाई मिळणार का? याबाबतचे प्रश्नचिन्ह कायम आहेत.
मी शेतकºयाच्या शेतावर जाऊन भात पिकाची पाहणी केली आहे. परिसरात अनेक शेतकºयांना हे भाताचे वाण दिले असून, परिसरातील एकाही शेतकºयाची तक्रार नाही. परतु कडू याची तक्रार आल्याने मी पाहणी केली असता त्या ठिकाणी आपण शेतामध्ये शेणखत टाकत असतो. त्यामध्ये जे काही तण असते त्यापासूनसुद्धा असा परिणाम होऊ शकतो किंवा पावसाळ्यात पावसाचे पाणी दुसºयाच्या शेतातून आपल्या शेतात येत असते. त्यापासूनसुद्धा असा प्रकार होऊ शकतो.त्या वाणाची शासनाकडून अनेक वेळा तपासणी केली जात असते. तेव्हा ते विक्रीसाठी उपलब्ध केले जाते. - डॉ. सी. आर. क्षीरसागर,
भातरोग शास्त्रज्ञ कृषी संशोधन केंद्र, लोणावळा
मी वाघेश्वर येथील धरणग्रस्त शेतकरी आहे. मला एवढीच जमीन असून, मी लोणावळा येथील शेतकी कार्यालयातून इंद्रायणी जातीचे भाताचे बीज ३०-३० किलोच्या दोन पिशव्या आणल्या होत्या. त्याची पेरणी केली असता इंद्रायणीचे कोणत्याही प्रकारचे पीक आले नाही. आता वर्षभर काय करू?काय खाऊ? मला लवकरात लवकर माझी भरपाई मिळावी.
- दत्तू झिरमा कडू, शेतकरी