आदिवासी वसतीगृहात मुलभूत सुविधांपासून मुले वंचित, विद्यार्थ्यांवर शिक्षण सोडण्याची वेळ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 7, 2018 03:27 AM2018-05-07T03:27:27+5:302018-05-07T03:27:27+5:30

येथील न्यायालयाच्या लगत असणाऱ्या शासकीय आदिवासी वसतिगृहाची दुरवस्था झाली आहे़ विद्यार्थ्यांना कोणत्याही मूलभूत सुविधा मिळत नसल्याने या वसतिगृहातील विद्यार्थी शिक्षण सोडून पुन्हा आपल्या गावी जाण्याची तयारी करू लागले आहेत.

Disadvantage of children from basic facilities in Tribal hostel | आदिवासी वसतीगृहात मुलभूत सुविधांपासून मुले वंचित, विद्यार्थ्यांवर शिक्षण सोडण्याची वेळ

आदिवासी वसतीगृहात मुलभूत सुविधांपासून मुले वंचित, विद्यार्थ्यांवर शिक्षण सोडण्याची वेळ

googlenewsNext

वडगाव मावळ -  येथील न्यायालयाच्या लगत असणाऱ्या शासकीय आदिवासी वसतिगृहाची दुरवस्था झाली आहे़ विद्यार्थ्यांना कोणत्याही मूलभूत सुविधा मिळत नसल्याने या वसतिगृहातील विद्यार्थी शिक्षण सोडून पुन्हा आपल्या गावी जाण्याची तयारी करू लागले आहेत.
वडगाव मावळ येथील आदिवासी विद्यार्थी वसतिगृहात गेल्या १५ दिवसांपासून उपाहारगृह बंद आहे. विद्यार्थ्यांना उपाशी राहण्याची वेळ आली आहे. वसतिगृहातील विद्यार्थी परीक्षा झाली असल्याने गावी गेले आहेत. तर वसतिगृहातील १६ विद्यार्थी इतर ठिकाणी शिक्षण घेत आहेत. वसतिगृहातच राहत आहेत. फक्त १६ विद्यार्थी असल्याने उपाहारगृह चालवणे परवडत नाही, असे कारण सांगून उपाहारगृह बंद केले आहे. परंतु या १६ विद्यार्थ्यांना दिवसाला प्रत्येकी १०० रुपये देण्याचे उपाहारगृहचालक यांनी ठरवले आहे. या १०० रुपयात विद्यार्थ्यांने २ वेळेचे जेवण व २ वेळेचा नाष्टा करायचा आहे. परंतु सध्या महागाईच्या काळात १०० रुपयात विद्यार्थ्यांचे भागत नसल्याने त्यांनी एक वेळ उपाशी राहून अभ्यास करावा लागत आहे. यामध्येही गेल्या तीन दिवसांपासून विद्यार्थ्यांना १०० रुपये मिळाले नसल्याने दोन दिवसांपासून विद्यार्र्थी उपाशी आहेत.

गळताहेत पाण्याच्या टाक्या
१मावळ, पालघर, जळगाव, नंदुरबार, नगर या भागातील विद्यार्थी वसतिगृहात राहतात. वसतिगृहाची प्रचंड दुरवस्था झाली असून, भर उन्हाळ्यात वसतिगृहाच्या छतावरून पाण्याच्या टाकीचे पाणी गळत आहे. पिण्याच्या पाण्याच्या टाकीची प्रचंड दुरवस्था झाली असून, पिण्याच्या पाण्याचा फिल्टर खराब झाल्याने विद्यार्थ्यांना खराब पाणी या वसतिगृहात प्यावे लागत आहे. परंतु या पाण्यामुळे विद्यार्थी आजारी पडू लागल्याने आता विद्यार्थी पिण्याच्या पाण्यासाठी वडगाव रेल्वे स्थानक किंवा वडगाव पोलीस ठाण्याच्या आवारातून पिण्यासाठी बाटलीतून पाणी भरून ठेवत आहेत.
शंभर रुपयांत दोन वेळा जेवा
२विद्यार्थ्यांच्या जेवणासाठी देण्यात येणारे शंभर रुपयात येथील कर्मचाºयांच्या खात्यावर ती पाठवले जातात. त्यानंतर तो कर्मचारी ते पैसे बँकेतून काडून विद्यार्थ्यांना प्रत्येकी शंभर रुपये वाटतो. परंतु गेल्या तीन दिवसांपासून कर्मचारी वसतिगृहात फिरकला नसल्याने विद्यार्थ्यांना शंभर रुपये मिळाले नाही व परिणामी त्यांना उपाशी राहावे लागत आहे. यापूर्वी वसतिगृहातून विद्यार्थ्यांना मिळणारे जेवण हे प्रचंड निकृष्ट दर्जाचे होते़ परंतु ते वेळेवर मिळत असल्याने विद्यार्थी कोणती तक्रार करत नव्हते. परंतु आता जेवण मिळत नसल्याने वसतिगृहात राहणे विद्यार्थ्यांना कठीण झाले आहे.
अंधारातच कराव लागतो अभ्यास
३ या वसतिगृहात विद्यार्थ्यांना झोपण्यासाठी बेड व्यवस्थित नाही़ वसतिगृहातील शौचालय मोडकळीस झाले असून एकाही बाथरूमला दरवाजा नाही. वसतिगृहात वीजपुरवठा असूनही विद्यार्थ्यांना अंधारात राहावे लागते़ कारण रूममध्ये लावण्यात येणारे बल्ब खराब झाले असून, गेल्या अनेक दिवसांपासून हे बल्ब बदली न केल्याने मुलांना अंधारात रहावे लागत आहे. रात्रीच्या अंधारात वसतिगृहाला सुरक्षारक्षक नसल्यामुळे मुलांची सुरक्षा धोक्यात आली आहे. वसतिगृहातील मुलांची संख्या कमी झाल्याने मुलांना बाहेर जेवणासाठी १०० रुपये रोज दिले जात आहेत.

गेल्या १५ दिवसांपासून वसतिगृहातील उपाहारगृह बंद करण्यात आले. त्याबदल्यात आम्हाला १०० रुपये दिले जात आहेत़ परंतु तेही वेळेवर मिळत नसल्याने आम्हाला उपाशी रहावे लागत आहे़ त्यामुळे उपाशी राहण्यापेक्षा निकृष्ट का होईना पण जेवण द्या, असे विद्यार्थ्यांनी सांगितले.
- नितीन भगत, गृहपाल

वसतिगृहातील मुलांची संख्या कमी झाल्याने मुलांना बाहेर जेवणासाठी १०० रुपये रोज दिले जात आहेत. त्यामुळे मुलांची कोणतीही गैरसोय होत नाही. तसेच हे वसतिगृह भाडेतत्त्वावर असल्याने तेथे कर्मचारी राहत नाही.
 

Web Title: Disadvantage of children from basic facilities in Tribal hostel

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.