दिशादर्शक फलकाअभावी गैरसोय, सांगवी फाट्यावरील समस्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 14, 2018 02:53 AM2018-06-14T02:53:13+5:302018-06-14T02:53:13+5:30

दिशादर्शक फलक लावण्यात न आल्याने सांगवी फाटा येथे वाहनचालकांची गैरसोय होत आहे. महापालिका प्रशासनाचे त्याकडे दुर्लक्ष आहे.

Disadvantages in the absence of directional pane | दिशादर्शक फलकाअभावी गैरसोय, सांगवी फाट्यावरील समस्या

दिशादर्शक फलकाअभावी गैरसोय, सांगवी फाट्यावरील समस्या

Next

सांगवी - दिशादर्शक फलक लावण्यात न आल्याने सांगवी फाटा येथे वाहनचालकांची गैरसोय होत आहे. महापालिका प्रशासनाचे त्याकडे दुर्लक्ष आहे. कुचंबणा टाळण्यासाठी येथे फलक लावण्यात यावा, अशी मागणी वाहनचालकांकडून होत आहे.
काळेवाडी फाटा व हिंजवडी आयटी पार्ककडून येणाऱ्या वाहनांना पुण्याच्या दिशेने व सांगवीकडे जाणाºया रस्त्यावर दिशादर्शक फलक न लावल्याने वाहनचालकांना मोठ्या अडचणीस सामोरे जावे लागत आहे.
हिंजवडी व काळेवाडी फाट्याकडून येणाºया व नोकरी, व्यवसाय व इतर कारणांसाठी पुण्याच्या दिशेकडे जाणाºया, तसेच मुंबई, सातारा, कोल्हापूरकडून राष्ट्रीय महामार्गाकडून येणाºया असंख्य वाहनचालकांना सांगवी फाट्यावरील महात्मा जोतिबा फुले उड्डाणपुलाजवळ दिशादर्शक फलक व माहितीफलक नसल्याने अपघात होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. कोट्यवधी रुपये खर्चून येथे उड्डाणपूल व ग्रेड सेपरेटर उभारण्यात आले. पुण्याच्या दिशेने माहितीफलक बसवण्यात आले; परंतु विरुद्ध दिशेकडून येणाºया ठिकाणी मात्र माहितीफलक बसवण्याचे महापालिका प्रशासन विसरले की काय, असे येथील परिस्थितीवरून दिसून येते. हिंजवडी, वाकड व काळेवाडी फाट्यावरील वाहने वेगाने पुण्याच्या दिशेने रोज जातात; पण सामान्य जिल्हा रुग्णालयाच्या पुढे आल्यानंतर सांगवीकडे वळण्यासाठी व पुण्याच्या दिशेला दिशादर्शक फलक नसल्याने नवख्या व बाहेरगावाहून येणाºया वाहनचालकांना गोंधळल्यासारखे होते व अचानक ब्रेक लावून वळणे, रस्त्यात थांबून विचारपूस करणे व माहितीफलक नसल्याने पुढे जाणे अशा समस्यांना सामोरे जावे लागत आहे. महापालिकेकडून लवकरात लवकर येथे दिशादर्शक फलक लावण्यात यावेत, अशी नागरिकांनी मागणी केली आहे. सांगवीकडे वळताना येथे निसरडे तीव्र वळण असून, वाहने वेगाने सांगवीकडे वळतात, तर औंधकडे जाणारी वाहने अचानक वळतात. दुर्घटना घडण्याअगोदर उपाययोजना करण्याची मागणी होत आहे.
 

Web Title: Disadvantages in the absence of directional pane

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.