निवडणूक कर्मचाऱ्यांना थम्ब इम्प्रेशनमध्ये सवलत

By ऑनलाइन लोकमत | Published: March 23, 2019 02:54 AM2019-03-23T02:54:18+5:302019-03-23T02:54:33+5:30

लोकसभा निवडणुकीची आचारसंहिता जारी झाल्याने निवडणुकीचे कामकाज सुरू झाले आहे.

 Discounts in thumb impressions for election workers | निवडणूक कर्मचाऱ्यांना थम्ब इम्प्रेशनमध्ये सवलत

निवडणूक कर्मचाऱ्यांना थम्ब इम्प्रेशनमध्ये सवलत

googlenewsNext

पिंपरी : लोकसभा निवडणुकीची आचारसंहिता जारी झाल्याने निवडणुकीचे कामकाज सुरू झाले आहे. निवडणुकीचे कामकाज हे राष्ट्रीय कामकाज असल्याने लोकसभा निवडणुकीच्या कामासाठी नियुक्त्या झालेल्या पिंपरी-चिंचवड महापालिकेतील अधिकारी, कर्मचाऱ्यांना थम्ब इम्प्रेशनमधून सवलत दिली आहे. आयुक्त श्रावण हर्डीकर यांनी याबाबतचे पत्रक प्रसिद्धीस दिले आहे.

निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार निवडणुकीच्या कामासाठी महापालिका कर्मचाऱ्यांना पाठविणे बंधनकारक आहे. लोकसभा निवडणुकीच्या कामकाजाकरिता महापालिकेच्या विविध विभागांतील अधिकारी, कर्मचाºयांच्या नियुक्त्या लोकसभा मतदारसंघांतर्गत केल्या जातात. पिंपरी-चिंचवड महापालिकेतील सुमारे चार हजार कर्मचाºयांची नियुक्ती मावळ आणि शिरूर लोकसभा मतदारसंघात झाली आहे. निवडणुकीच्या कामकाजाचे आदेशही दिले आहेत. पिंपरी, चिंचवड आणि भोसरी विधानसभानिहाय कार्यालयेही सुरू झालेली आहे. निवडणूक कामकाज नियुक्तीचे आदेश जिल्हाधिकाºयांमार्फत महापालिकेकडे पाठविले जातात. संबंधित विभागामार्फतच निवडणूक कामकाजाकरिता अधिकारी, कर्मचाºयांना कार्यमुक्त करण्यात येते. महापालिका अधिकारी, कर्मचाºयांची सेवा लोकप्रतिनिधित्व अधिनियमानुसार निवडणूक कामकाजाकामी अधिग्रहित करण्यात येते. निवडणुकीचे कामकाज हे राष्ट्रीय कामकाज असल्याने अधिकारी, कर्मचारी यांना महापालिकेच्या बायोमेट्रिक थम्ब उपस्थिती प्रणातीलून सवलत देण्यात आली आहे.

निवडणूक कार्यालयाकडे रुजू झालेल्या दिनांकापासून ही सवलत दिली आहे. निवडणूक कामकाजातून कार्यमुक्त केल्यानंतर अधिकारी, कर्मचाºयांना बायोमेट्रिक थम्ब इम्प्रेशनद्वारे उपस्थिती नोंदवणे आणि हजेरीपत्रकावर दैनंदिन स्वाक्षरी करणे बंधनकारक राहील. तसे निर्देश प्रशासन विभागास दिले आहेत. - श्रावण हर्डीकर, आयुक्त

Web Title:  Discounts in thumb impressions for election workers

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.