महापौर परिषदेत होणार हक्कासाठी चर्चा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 6, 2018 03:03 AM2018-01-06T03:03:58+5:302018-01-06T03:04:04+5:30
महाराष्ट्र महापौर परिषदेची सभा पणजी, गोवा येथे आठ जानेवारीला होणार असून, त्यात महापौरांच्या हक्क आणि अधिकारांवर चर्चा होणार आहे. अधिकार वाढविण्यासाठी शासनाला साकडे घातले जाणार आहे.
पिंपरी - महाराष्ट्र महापौर परिषदेची सभा पणजी, गोवा येथे आठ जानेवारीला होणार असून, त्यात महापौरांच्या हक्क आणि अधिकारांवर चर्चा होणार आहे. अधिकार वाढविण्यासाठी शासनाला साकडे घातले जाणार आहे.
महापौर परिषद, पणजी येथे होणार असून, मुंबईचे महापौर विश्वनाथ महाडेश्वर यांच्या अध्यक्षतेखाली सुमारे सहा विषयांवर चर्चा होणार आहे. या परिषदेसाठी पिंपरीचे महापौर नितीन काळजे गोव्याला रवाना झाले आहेत. सोमवारी सकाळी दहाला ही परिषदेची सोळावी सभा होणार आहे. त्यात विषयपत्रिकेवर सहा विषय असणार आहेत. राज्य शासनाने २०१४ मध्ये जाहीर केलेल्या महिला धोरणानुसार राज्यातील महापालिकांच्या विकास आराखड्यात महिला उद्योग भवनासाठी जागा आरक्षित करण्यात यावी व उद्योग भवन उभारण्यासाठी शासनाकडून १०० टक्के अनुदान मिळावे. महापौरपदाचा दर्जा विचारात घेता त्यांना नागरिकांना सेवासुविधा पुरविण्यासाठी ठरावीक रकमेपर्यंतची कामे करण्याचा अधिकार देण्याबाबत महापालिका अधिनियमात दुरुस्ती करावी. महाराष्टÑ महापौर परिषदेचे उपाध्यक्षपद रिक्त झाले आहे. नवीन उपाध्यक्षांची निवड करणे, परिषदेच्या जमा-खर्चास मंजुरी देणे, तसेच आयत्या वेळी येणाºया विषयांवरही चर्चा केली जाणार आहे, अशी माहिती नितीन काळजे यांनी दिली.
महाराष्टÑ महापौर परिषदेचे उपाध्यक्षपद रिक्त झाले आहे. नवीन उपाध्यक्षांची निवड होणार आहे. त्यात कोणाची वर्णी लागणार याबाबत उत्सुकता आहे. तसेच परिषदेत चर्चा करून या संदर्भात शासनाकडे विविध मागण्यांसाठी पत्रव्यवहार आणि साकडे घातले जाणार आहे.