प्रकल्प उद्घाटने रद्दची नामुष्की

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 23, 2018 12:59 AM2018-07-23T00:59:21+5:302018-07-23T00:59:39+5:30

आरोप झाल्याने सत्ताधाऱ्यांची चपळाई

Dismissal cancellation of project inauguration | प्रकल्प उद्घाटने रद्दची नामुष्की

प्रकल्प उद्घाटने रद्दची नामुष्की

Next

पिंपरी : पिंपरी-चिंचवडच्या दौºयात महापालिकेच्या वतीने उभारण्यात येणाºया प्रकल्पांची ‘ई’ उद्घाटने करण्याचे जाहीर केले होते. मात्र, वडमुखवाडीतील पंतप्रधान आवास योजनेवरून आरोप झाल्याने उद्घाटने लांबणीवर टाकण्याची नामुष्की सत्ताधाºयांवर आली आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत केवळ चापेकर राष्टÑीय संग्रहालयाचे उद्घाटन होणार आहे.
महापालिकेतर्फे चार दिवसांपूर्वी वडमुखवाडीतील पंतप्रधान आवास योजना, चºहोलीतील वेस्ट टू एनर्जी, चिंचवड येथील क्रांतिवीर चापेकर बंधू यांचे राष्टÑीय संग्रहालय अशा प्रकल्पांचे नियोजन केले होते. पंतप्रधान आवास योजनेवरून भ्रष्टाचाराचे आरोप झाल्याने एकच कार्यक्रम घेण्यात येणार असल्याचे सत्ताधाºयांनी जाहीर केले आहे. याबाबत शहराध्यक्ष लक्ष्मण जगताप यांनी उद्घाटने लांबणीवर टाकण्याची नामुष्की आली नसल्याचे पत्रकारांशी बोलताना सांगितले. तसेच आवास योजना उद्घाटनासाठी पंतप्रधान येणार असल्याने मुख्यमंत्र्यांनी कार्यक्रम रद्द केल्याचे जगताप म्हणाले.
मुख्यमंत्री सोमवारी शहरात येत आहेत. त्यामुळे पदाधिकारी बदलावर काय बोलतात याकडे लक्ष लागले आहे. महापौरपदासाठी स्थायी समिती सभापतीपदासाठी डावलण्यात आलेले आमदार महेश लांडगे समर्थक राहुल जाधव, संतोष लोंढे, आमदार लक्ष्मण जगताप यांचे समर्थक शत्रुघ्न काटे, शशिकांत कदम, नामदेव ढाके यांच्या नावांचा विचार होऊ शकतो. स्थायी समितीपद चिंचवडकरांकडे आहे. त्यामुळे महापौरपद भोसरीकरांकडे कायम ठेवण्याची शक्यता आहे. उपमहापौरपदासाठी शीतल शिंदे यांच्या नावाची चर्चा आहे.

कारभारी बदल : आज होणार निर्णय
महापालिकेतील महापौर, उपमहापौर आणि सभागृह नेता बदलणार असल्याची चर्चा गेल्या अनेक दिवसांपासून सुरू आहे. याबाबतचा अंतिम निर्णय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हेच घेणार आहेत. या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री उद्या शहरात येत आहेत. त्यामुळे मुख्यमंत्री फडणवीस पालिकेतील पदाधिकारी बदलण्याचा निर्णय घेणार का? याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

महापालिकेतील कारभाºयांनी सर्व नगरसेवकांना विविध पदांवर संधी देण्याचे धोरण निश्चित केले आहे. त्यानुसार स्थायी समितीतील सदस्यांना एक वर्षांचाच कार्यकाळ दिला होता. त्यानंतर विषय समितींचे सभापती, प्रभाग समिती अध्यक्ष बदलले. महापौर बदलाचेही संकेत दिले होते. महापौर नितीन काळजे, उपमहापौर शैलजा मोरे, सभागृह नेते एकनाथ पवार यांना बदलणार की नाही. याबाबत महापालिकेतील राजकीय वर्तुळात उत्सुकता आहे.

Web Title: Dismissal cancellation of project inauguration

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.