निगडी ओटास्किम परिसरात संघटनेचा फलक लावण्यावरून दोन गटात वाद
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 21, 2017 03:48 PM2017-12-21T15:48:09+5:302017-12-21T15:53:13+5:30
निगडी ओटास्किम परिसरात दोन गटात काही कारणास्तव बुधवारी रात्री वाद झाला. या वादातून निगडी परिसरात तणावाची परिस्थिती निर्माण झाली. पोलिसांनी दोन्ही गटातील कार्यकर्ते, पदाधिकारी यांची समजूत घातली.
पिंपरी : निगडी ओटास्किम परिसरात दोन गटात काही कारणास्तव बुधवारी रात्री वाद झाला. या वादातून निगडी परिसरात तणावाची परिस्थिती निर्माण झाली. दुसऱ्या दिवशी सकाळी निगडी पोलीस ठाण्यात मोठा जमाव जमला. सामाजिक सलोख्याला बाधा पोहोचण्याची शक्यता निर्माण झाल्याने पोलिसांनी दोन्ही गटातील कार्यकर्ते, पदाधिकारी यांची समजूत घातली.
संघटनेचा फलक लावण्यावरून दोन गटात वाद झाला. दोन्ही गटाचे कार्यकर्ते हमरीतुमरीवर आले. रात्री घडलेल्या या घटनेचे पडसाद दुसऱ्या दिवशी गुरूवारीही परिसरात उमटले. मोठ्या संख्येने दोन्ही संघटनांचे कार्यकर्ते पोलीस ठाण्यात जमा झाले. परस्परविरोधी तक्रार करण्याची आग्रही मागणी होऊ लागली. पोलिसांनी दोन्ही गटातील कार्यकर्त्यांची समजूत घालून तोडगा काढण्याचा प्रयत्न केला. नगरसेवक पोलिसांनी ठोस कारवाई करावी, या मागणीसाठी एका राजकीय पक्षाचे पदाधिकारी, नगरसेवक निगडी पोलीस ठाण्यात ठिय्या मांडला. परिस्थिती चिघळू लागल्यामुळे पोलिसांनी सामाजिक सलोख्यासाठी सायंकाळी पाचला तातडीची बैठक बोलावली आहे. वादाच्या घटनेला वेगळे वळण लागू नये. यासाठी पोलीस अधिकाºयांनी विशेष दक्षता घेतली.