जिल्हास्तरीय जिम्नॅस्टिक : हर्षिता काकडे, निशांत पाटीलची बाजी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 27, 2018 11:27 PM2018-08-27T23:27:51+5:302018-08-27T23:28:39+5:30
सानया गोखले, स्वरूप जाचक, शिवम हगवणे यांचेही यश
पिंपरी : पिंपरी-चिंचवड महापालिका आणि पुणे जिल्हा क्रीडा परिषदेच्या वतीने आयोजित जिल्हास्तरीय शालेय जिम्नॅस्टिक क्रीडा स्पर्धा उत्साहात पार पडल्या. यामध्ये आर्टिस्टिक क्रीडाप्रकारात विविध वयोगटांत हर्षिता काकडे, निशांत पाटील, सानया गोखले, स्वरूप जाचक, शिवम हगवणे यांनी बाजी मारली.
निगडीतील ज्ञानप्रबोधिनी विद्यालयात झालेल्या या स्पर्धेचे उद्घाटन महापौर राहुल जाधव यांच्या हस्ते झाले. या वेळी नगरसेवक शरद मिसाळ, अमित गावडे, तुषार हिंगे, अमित गोरखे, उपकेंद्रप्रमुख मनोज देवळेकर, क्रीडा स्पर्धाप्रमुख विश्वास गेंगजे, जिम्नॅस्टिक प्रशिक्षक लखन बगले, सोपान खोसे आदी उपस्थित होते. सूत्रसंचालन शैलेश डुंबरे यांनी केले, तर भगवान सोनवणे यांनी आभार मानले. पंच म्हणून शुभम भालेकर, आशिष भालेकर, जयदीप घुगे, नक्षत्र जांगिड, निष्ठा शहा, अधिश्री रजपूत यांनी काम पाहिले.
निकाल पुढीलप्रमाणे- आर्टिस्टिक (१९ वर्षे मुले) -शिवम हगवणे (प्रथम), अभिषेक साठे (द्वितीय), अभिषेक साखरे (तृतीय, तिघेही ज्ञानप्रबोधिनी विद्यालय, निगडी), (१७ वर्षे मुले) स्वरूप जाचक (प्रथम), अथर्व जगताप (द्वितीय, दोघेही ज्ञानप्रबोधिनी विद्यालय), हिमांशू चौगुले (तृतीय, डीआयसीई स्कूल).
(१७ वर्षे मुली) सानया गोखले (प्रथम, सिटी प्राइड स्कूल), आद्या कशाळीकर (द्वितीय, म्हाळसाकांत विद्यालय), आरोही चक्रवर्ती (तृतीय, सिटी इंटरनॅशनल स्कूल), (१४ वर्षे मुले) निशांत पाटील (प्रथम), निरंजन यादव (द्वितीय, दोघेही ज्ञानप्रबोधिनी विद्यालय), तनिष्क सावंत (तृतीय-सेंट अर्सलाक हायस्कूल), (१४ वर्षे मुली) हर्षिता काकडे (प्रथम - एस. बी. पाटील पब्लिक स्कूल), जान्हवी गोविंद वाणी (द्वितीय-सीएमएस स्कूल), संस्कृती तेलवणे (तृतीय-आॅर्चिड इंग्लिश स्कूल).
ºिहदमिक जिम्नॅस्टिक -(१७ वर्षे मुली) प्रेरणा धर्माणी (प्रथम), रिया फुलसुंदर (द्वितीय, दोघीही जयहिंद हायस्कूल), शांभवी आफळे (तृतीय - पी. जोग इंग्लिश स्कूल), (१४ वर्षे मुली) मैत्रेय क्षीरसागर (प्रथम, मनोराम प्राथमिक शाळा), रिया भागवत (द्वितीय-कमलनयन बजाज स्कूल), रिशिका आठले (तृतीय-अमृता विद्यालय).
४अॅक्रोबॅटिक्स (१९ वर्षे मुले, मुली-मिक्स पेअर)- हिमांशू चौगुले (प्रथम), द्रोणाक्षी नलावडे (द्वितीय) दोघेही डीआयसी स्कूल.
४(१९ वर्षे मुले-मेन्स टीम) रुतिक भोंडवे (प्रथम), अनुज कांबळे (द्वितीय), रोहित किरोंत्रा (तृतीय, तिघेही एस. बी. पाटील पब्लिक स्कूल).
४(१९ वर्षे मुली-वुमेन ट्रायो) अवनी खंडेलवाल (प्रथम), सावंतिका कुरे (द्वितीय), श्रेया जाधव (तृतीय, तिघीही एस.बी. पाटील पब्लिक स्कूल).
४(१९ वर्षे मुली-वुमेन पेअर) मनस्वी जाधव (प्रथम), तन्वी चिंचवडे (द्वितीय, दोघेही एस. बी. पाटील पब्लिक स्कूल). (१९ वर्षे मुले-मेन पेअर) कृष्णा ठाकुर (प्रथम), अनुष्का चौधरी (द्वितीय, दोघे एस.बी. पाटील स्कूल).