दुसऱ्या लग्नाविषयी विचारणा केली म्हणून पत्नीला दिला तोंडी तलाक; चिंचवडमधील धक्कादायक घटना
By ऑनलाइन लोकमत | Published: February 8, 2023 07:50 PM2023-02-08T19:50:55+5:302023-02-08T19:55:02+5:30
पोलिसांनी आरोपी पतीसह महिलेचे सासरे, दीर यांच्यासह तीन महिलांवर गुन्हा दाखल केला....
पिंपरी : माहेरून मोटार आणण्यासाठी पैसे आणावेत, सोन्याची दागिने घेऊन यावेत यासाठी सासरच्या मंडळींसह पतीने पत्नीचा छळ केला. तसेच पतीने दुसरे गुपचूप लग्न केले. याचा पत्नीने जाब विचारला असता तिला तोंडी तलाक दिला. ही घटना १५ फेब्रुवारी २०२१ ते चार फेब्रुवारी २०२३ या कालावधित चिंचवड येथे घडली. या प्रकरणी महिलेने मंगळवारी (दि. ७) पिंपरी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली. त्यानुसार पोलिसांनी आरोपी पतीसह महिलेचे सासरे, दीर यांच्यासह तीन महिलांवर गुन्हा दाखल केला.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादीच्या माहेरच्या लोकांविषयी आरोपींनी वाईट बोलले. तसेच फिर्यादी यांच्या लग्नात काहीच घेऊन न आल्यामुळे चारचाकी गाडी आणि दागिने घेऊन येण्याची मागणी आरोपींनी फिर्यादीकडे करत मानसिक, शारीरिक त्रास दिला. फिर्यादीच्या पतीने गुपचूप दुसरे लग्न केले. याविषयी फिर्यादीच्या माहेरीलकडील लोकांनी आरोपीला दुसरा लग्नाविषयी विचारण्यासाठी गेले असता आरोपीने पत्नीला फिर्यादीला तीन वेळा तलाक बोलून घरातून हाकलून दिले, असे फिर्यादीत नमूद आहे.