तंबाखूजन्य पदार्थ खाऊ नका
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 27, 2018 02:20 AM2018-03-27T02:20:51+5:302018-03-27T02:20:51+5:30
देशात दरवर्षी आठ लाखांहून अधिक व्यक्तींचा तंबाखूजन्य पदार्थांचे सेवन केल्यामुळे मृत्यू होत असल्याची आकडेवारी प्रसिद्ध झाली आहे.
भोसरी : देशात दरवर्षी आठ लाखांहून अधिक व्यक्तींचा तंबाखूजन्य पदार्थांचे सेवन केल्यामुळे मृत्यू होत असल्याची आकडेवारी प्रसिद्ध झाली आहे. पोलीस दलात कामाचे स्वरूप आणि धावपळ अधिक आहे. त्यामुळे पोलीस तंबाखूजन्य पदार्थांचे सेवन करतात, यातून पुढे अनेक आजार होण्याची शक्यता असते. पोलिसांनी आरोग्याची काळजी घेण्याची गरज आहे. मौखिक आजारांची भीषणता पाहता सर्वांनीच मौखिक आरोग्याची काळजी घेणे आवश्यक आहे. तंबाखूजन्य पदार्थांचे सेवन टाळल्यास आजारांपासून लांब राहता येईल, असे मत परिमंडल तीनचे पोलीस उपायुक्त गणेश शिंदे यांनी येथे व्यक्त केले.
इंडियन डेंटल असोसिएशनच्या पिंपरी-चिंचवड शाखेच्या वतीने जागतिक मौखिक आरोग्य दिनानिमित्त पिंपरी येथे विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. यामध्ये मौखिक आरोग्य तपासणी, आरोग्य निरीक्षक, पोलीस, शिक्षक, अंध व विशेष विद्यार्थ्यांना मार्गदर्शन, उत्कृष्ट कार्य केलेल्या दंतवैद्यांचा गौरव करण्यात आला. पोलीस उपायुक्त शिंदे यांच्या हस्ते कार्यक्रमाचे उद्घाटन करण्यात आले. पीएनजी अॅण्ड सन्सच्या संचालिका रेणू गाडगीळ, नॉव्हेल ग्रुप आॅफ इन्स्टिट्यूटचे अमित गोरखे, वायसीएम रुग्णालयाच्या दंत विभागाचे प्रमुख डॉ. यशवंत इंगळे, एमडीएचे उपाध्यक्ष डॉ. राकेश प्रसाद, डॉ. विकास बेंदगुडे, सचिव डॉ. मनीषा गरुड, खजिनदार डॉ. कौस्तुभ पाटील, डॉ. संदीप भिरूड, डॉ. सुहासिनी घाणेकर, डॉ. युसुफ चुनावाला आदी या वेळी उपस्थित होते.