झोपडपट्टी पुनर्वसनाचा सर्व्हे करा
By Admin | Published: September 15, 2015 04:15 AM2015-09-15T04:15:57+5:302015-09-15T04:15:57+5:30
महापालिकेच्या वतीने शहरात अनेक महत्त्वाच्या मोकळ्या जागी झोपडपट्टी पुनर्वसन प्रकल्प राबविला गेला आहे. या प्रकल्पाचे फेर सर्वेक्षण करणे गरजेचे आहे.
- राहुल वडमारे, पिंपरी
महापालिकेच्या वतीने शहरात अनेक महत्त्वाच्या मोकळ्या जागी झोपडपट्टी पुनर्वसन प्रकल्प राबविला गेला आहे. या प्रकल्पाचे फेर सर्वेक्षण करणे गरजेचे आहे.
तेथील झोपडपट्टी नाल्यांवर, गटारींवर होत्या. घाण कचरा, दुर्गंधी, दर वर्षी येणारा नदीला पूर यांमुळे तेथील नागरिकांच्या आरोग्याचा गंभीर प्रश्न निर्माण झाला होता. एवढ्या मोठा सामना करत असतानाही झोपडपट्टीधारक संकटाच्या वेळेस एकमेकांकरिता धावून जायचे. मदत करायचे. दादागिरी, गुंडगिरी, फसवेगिरी करणाऱ्यांविरुद्ध एकत्र येऊन विरोध करायचे. जसेच्या तसे उत्तर द्यायचे. अशांना पोलीस पकडायला आले, तर ते सापडायचे नाहीत. कारण झोपडपट्टीतल्या नागरिकालाच माहीत होते की, कुठली गल्ली बाहेर पडायची आहे. त्यामुळे पोलिसांची दमछाक व्हायची. अशा प्रकारे झोपडपट्टीतले लोकजीवन जगत होते.
या सर्वांतून झोपडपट्टीधारकांना बाहेर काढण्यासाठी झोपडपट्टी पुनर्वसन प्रकल्प राबविण्यात आला. मात्र, सत्य आज उलट आहे. ज्या वेळेस हे लोक झोपडपट्टीत राहत होते, तेव्हा ते समाधानी व गुण्यागोविंदाने राहत होते. परंतु, आज हे लोक चांगल्या स्वरूपातील घरे मिळूनही आम्हाला झोपडपट्टीच बरी होती, असे म्हण्याची वेळ आली आहे. कारण, या लोकांना येथे अनेक प्रकारच्या दादागिरीला, गुंडगिरीला नेतेगिरीला सामोरे जावे लागत आहे. दर आठ दिवसांनी या ठिकाणी काही तरी भांडणे होत आहेत. रात्री-बेरात्री आरडा ओरडीला सामोरे जावे लागत आहे. ही लोक अशिक्षित असल्यामुळे ते काय, अन्यायाविरुद्ध आवाज उठविणार आहेत. गरीब लोक काय न्याय मागणार आहेत? महापालिकेने ज्या उद्देशाने हा प्रकल्प राबविला, तो यशस्वी झाला का, याचे सर्वेक्षण झाले पाहिजे. ही संपत्ती महापालिकेचीच आहे. चुकीच्या गोष्टींवर निर्बंध लादणे हे गरजेचे आहे.
लेखक - धम्मदीप प्रतिष्ठानाचे संस्थापक-अध्यक्ष आहेत.