सलाईनव्दारे विषारी औषध घेऊन डॉक्टरची आत्महत्या
By ऑनलाइन लोकमत | Published: February 8, 2018 05:59 PM2018-02-08T17:59:58+5:302018-02-08T18:00:21+5:30
सलाईनव्दारे विषारी औषध घेऊन मोशीत एका डॉक्टरने आत्महत्या केल्याची घटना गुरूवारी संकाळी ११ च्या सुमारास उघडकीस आली. महेश महादेव मोहिते (वय २८) असे आत्महत्या केलेल्या डॉक्टरचे नाव आहे.
पिंपरी - सलाईनव्दारे विषारी औषध घेऊन मोशीत एका डॉक्टरने आत्महत्या केल्याची घटना गुरूवारी संकाळी ११ च्या सुमारास उघडकीस आली. महेश महादेव मोहिते (वय २८) असे आत्महत्या केलेल्या डॉक्टरचे नाव आहे. आत्महत्येचे कारण स्पष्ट झाले नाही. भोसरी एमआयडीसी पोलिसांनी या प्रकरणी गुन्हा दाखल झाला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मोशी येथे सकाळी ११ च्या सुमारास महेश मोहिते या डॉक्टरने आत्हत्या केल्याची घटना उघडकीस आली. मोशी येथे त्यांचे जयहिंद नावाचे रूग्णालय आहे. सकाळी काही रूग्ण डॉक्टरांना भेटण्यास घरी आले. त्यावेळी डॉक्टरचे बंधु त्यांच्या बोलावण्यासाठी खोलीत गेले. तेथे गेले असता, खिडकीला सलाईनची बाटली अडकविल्याचे त्यांना दिसून आले. बाजुला इंजेक्शन पडले होते.डॉक्टर बेशुद्धावस्थेत खाटेवर झोपले होते. हे पाहताच त्यांनी बेशुद्ध पडलेल्या डॉक्टर बंधुला तातडीने खासगी रूग्णालयात नेले, मात्र खासगी रूग्णालयाच्या डॉक्टरांनी ते मृत झाले असल्याचे घोषित केले. आजुबाजुला कोठेही चिठ्ठी आढळून आली नाही. त्यामुळे आत्महत्येचे नेमके कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही. भोसरी एमआयडीसी पोलीस या प्रकरणी अधिक तपास करीत आहेत.