दरोडाप्रकरणाचे सापडले धागेदोरे
By admin | Published: December 4, 2015 02:42 AM2015-12-04T02:42:24+5:302015-12-04T02:42:24+5:30
वाल्हेकरवाडीतील दरोड्याप्रकरणी पोलिसांच्या हाती धागेदोरे लागले असून, दरोड्याच्या घटनेचा उलगडा करणे पोलिसांना सुलभ होणार आहे. दरोड्यात घरमालक मधुकर पाटील
पिंपरी : वाल्हेकरवाडीतील दरोड्याप्रकरणी पोलिसांच्या हाती धागेदोरे लागले असून, दरोड्याच्या घटनेचा उलगडा करणे पोलिसांना सुलभ होणार आहे. दरोड्यात घरमालक मधुकर पाटील जखमी झाले. हल्लेखोरांमध्ये दोनपेक्षा अधिक व्यक्ती नसल्याचे त्यांचे म्हणणे आहे. त्यामुळे पाटील यांच्यावरील हल्ला दरोडा संबोधता येणार नसल्याचे पोलिसांचे मत आहे.
कंपनीत दुसऱ्या पाळीतील काम संपवून घरी येण्याची वेळ रात्री साडेअकरा ते बारा, या वेळेत पाटील यांच्या घरी हल्लेखोर पोहोचले. नियोजनबद्धरीत्या त्यांनी घरमालक पाटील यांच्यावर हल्ला केला. घरावर पाळत ठेवूनच हल्ला केला, असा अंदाज आहे.
रात्री पावणेबाराच्या सुमारास ते घरी पोहोचले. तत्पूर्वीच पत्नी मनीषा, दोन मुली व मुलगा घराबाहेर पडले होते. हल्लेखोरांनी कोयत्याचा धाक दाखविल्यावर मनीषा यांनी कसलाही विरोध न करता दागिने काढून दिले होते. एका हल्लेखोराने पाटील यांच्यावर हल्ला केला. कोयत्याने वार करून त्यांना गंभीर जखमी केले. हल्ला चोरीच्या उद्देशाने झाला की, पाटील यांना जीवे मारण्याच्या उद्देशाने झाला, याचा तपास पोलीस करीत आहेत.
(प्रतिनिधी)