डॉजबॉल स्पर्धा : म्हाळसाकांत, मॉडर्नचे यश

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 27, 2018 01:27 AM2018-08-27T01:27:39+5:302018-08-27T01:28:09+5:30

ज्ञानप्रबोधिनी नवनगर विद्यालयाचीही बाजी

Dodgeball competition: Mhalsakant, modern success | डॉजबॉल स्पर्धा : म्हाळसाकांत, मॉडर्नचे यश

डॉजबॉल स्पर्धा : म्हाळसाकांत, मॉडर्नचे यश

Next

पिंपरी : पिंपरी-चिंचवड महापालिका व जिल्हा क्रीडा परिषद यांच्या वतीने भोसरी येथे डॉजबॉल स्पर्धा पार पडल्या. यामध्ये १७ वर्षे मुलींच्या गटात निगडीतील यमुनानगर येथील मॉडर्न इंग्लिश स्कूलने तर मुलांच्या गटात निगडीतील ज्ञानप्रबोधिनी नवनगर विद्यालयाने यश संपादन केले. यासह १९ वर्षे मुलींच्या आणि मुलांच्या गटात आकुर्डीतील म्हाळसाकांत माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयाने बाजी मारली.

भोसरीतील इंद्रायणीनगर येथील संत ज्ञानेश्वर क्रीडा संकुलात आयोजित या स्पर्धेचे उद्घाटन क्रीडा समितीचे सभापती संजय नेवाळे यांच्या हस्ते झाले. या वेळी नगरसेवक विलास मडिगेरी, क्रीडाधिकारी रज्जाक पानसरे, गुरुराज कुलकर्णी, स्पर्धाप्रमुख क्रीडा पर्यवेक्षक आशा ढवळे, भगवान सोनवणे, आत्माराम महाकाळ, युवराज गवारी, बाळासाहेब काळभोर, कमलाकर कांबळे आदी उपस्थित होते. विनायक कदम, सागर माळी, सुशांत म्हावरकर, अनुराग हिंगे, अनिल दाहोत्रे यांनी पंच म्हणून काम पाहिले, तर महाराष्ट्र राज्य डॉजबॉल असोसिएशनचे उपाध्यक्ष भगवान सोनवणे यांनी पंचप्रमुख कामकाज पाहिले. या स्पर्धेत ७० शाळांतील सातशे विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदविला. क्रीडाशिक्षक सुभाष जावीर यांनी सूत्रसंचलन केले. आत्माराम महाकाळ यांनी आभार मानले.

१७ वर्षे मुलींच्या गटात उपांत्यफेरी पिंपरीतील जयहिंद माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयाने बोपखेलमधील जे.जे. इंटरनॅशनल स्कूल विरुद्ध विजय मिळविला. विजयी संघाकडून संजना परदेशी, उमंग परदेशी, सानिका तरडे यांनी पराभूत संघाकडून अनुजा सिंग, मनीषा जयस्वाल, साक्षी पवार यांनी उत्कृष्ट खेळ केला.
यासह अंतिम सामन्यात निगडीतील यमुनानगर येथील मॉडर्न इंग्लिश मीडिअम हायस्कूलने पिंपरीतील जयहिंद माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयाचा पराभव करीत यश संपादन केले. विजयी संघाकडून प्रतीक्षा गाडेकर, पूजा साळवे, अमिषा नाईक यांनी, तर पराभूत संघाकडून उमंग परदेशी, सानिका तरडे, संजना परदेशी यांनी उत्कृष्ट खेळ केला. जे. जे. इंटरनॅशनल स्कूलचा संघ तृतीय क्रमांकासाठी पात्र ठरला.

१९ वर्षे मुलांच्या गटात उपांत्य फेरी १ मध्ये आकुर्डीतील म्हाळसाकांत माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयाने निगडीतील मॉडर्न हायस्कूल व ज्युनिअर कॉलेजचा पराभव केला. विजयी संघाकडून अनिकेत टापसे, आदित्य निकम, श्रेयस थोरात यांनी तर पराभूत संघाकडून विवेक कासार, आशिष दांगडे यांनी चांगला खेळ केला.
उपांत्यफेरी २ मध्ये राजमाता जिजाऊ शिक्षण प्रसारक महाविद्यालयाने चिंचवड येथील श्रीमती गोदावरी हिंदी विद्यालय व ज्युनिअर कॉलेजचा पराभव केला. विजयी संघाकडून श्रेयश वाडेकर, विलास पळसंबकर, अनिकेत बिरादार यांनी तर पराभूत संघाकडून शिवम गुप्ता, समीर करीमखान यांनी चमकदार कामगिरी केली. अंतिम सामन्यात श्री म्हाळसाकांत माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयाने राजमाता जिजाऊ शिक्षण संस्थेच्या कॉलेजचा पराभव केला. विजयी संघाकडून अनिकेत टापसे, आदित्य निकम, श्रेयस थोरात यांनी तर पराभूत संघाकडून विलास पळसंबकर, अनिकेत बिरादार यांनी उत्कृष्ट खेळ केला.

तृतीय क्रमांकासाठी श्रीमती गोदावरी हिंदी विद्यालय व ज्युनिअर कॉलेज व मॉडर्न हायस्कूल व ज्युनिअर कॉलेज यांच्यात लढत झाली. यामध्ये गोदावरी हिंदी विद्यालय व ज्युनिअर कॉलेजने यश संपादन केले.

यासह १७ वर्षे मुलांच्या गटात उपांत्य फेरी १ मध्ये पिंपरीतील जयहिंद माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयाने चिखली, जाधववाडी येथील अभिनव माध्यमिक विद्यालयाचा पराभव केला. विजयी संघाकडून अमित टेकाळे, दानिश दलाल, सिद्धेश्वर भोर यांनी, तर पराभूत संघाकडून जुबेर शेख, ओंकार शेडगे, बॉबी बागडे यांनी उत्कृष्ट खेळ केला. उपांत्य फेरी २ मध्ये निगडीतील ज्ञानप्रबोधिनी नवनगर विद्यालयाने मॉडर्न इंग्लिश मीडिअम स्कूलचा पराभव केला. विजयी संघाकडून भुवन चिंचवडे, हर्षल काळे, अभिषेक साखरे तर पराभूत संघाकडून महेश पाटील, अनिकेत पवार यांनी उत्कृष्ट खेळ केला.

४अंतिम फेरीत निगडीतील ज्ञानप्रबोधिनी नवनगर विद्यालयाने पिंपरीतील जयहिंद माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयाचा पराभव केला. यामध्ये विजयी संघाकडून अभिषेक साखरे, हर्षल काळे, भुवन चिंचवडे यांनी, तर पराभूत संघाकडून अमित टेकाळे, दानिश दलाल, सिद्धेश भोर यांनी चांगला खेळ केला.
४तृतीय क्रमांकासाठी अभिनव माध्यमिक विद्यालय व मॉडर्न इंग्लिश मीडिअम स्कूल यांच्यात लढत झाली. यामध्ये अभिनव विद्यालयाने यश संपादन केले.

४१९ वर्षे मुलींच्या गटात उपांत्य फेरी १ मध्ये भोसरीतील राजमाता जिजाऊ शिक्षण प्रसारक महाविद्यालयाने देहूरोड येथील लायन्स क्लब इंग्लिश मीडिअम स्कूलचा पराभव केला. विजयी संघाकडून श्वेता कळसाईत, आरती पवार, भावना उकिरडे यांनी, तर पराभूत संघाकडून मिनाज शेख, आफशाह शेख यांनी चांगला खेळ केला. उपांत्यफेरी २ मध्ये आकुर्डीतील म्हाळसाकांत माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयाने निगडीतील मॉडर्न हायस्कूल व ज्युनिअर कॉलेजचा पराभव केला.

अंतिम फेरीत म्हाळसाकांत माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयाने राजमाता जिजाऊ शिक्षण प्रसारक महाविद्यालयाचा पराभव करीत यश संपादन केले. विजयी संघाकडून वैष्णवी कुलकर्णी, हर्षिता पाटील, सत्यम सिंग यांनी, तर पराभूत संघाकडून आरती पवार, भावना उकिरडे यांनी उत्कृष्ट खेळ केला. तृतीय क्रमांकासाठी लायन्स क्लब इंग्लिश मीडिअम स्कूल व मॉडर्न हायस्कूल व ज्युनिअर कॉलेज यांच्या लढत झाली. यामध्ये लायन्स क्लब स्कूलने विजय मिळविला.

Web Title: Dodgeball competition: Mhalsakant, modern success

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.