बुलेटचा मोठमोठ्याने आवाज करू नका; ७ जणांच्या टोळक्याचा एकावर खुनी हल्ला

By विश्वास मोरे | Updated: March 14, 2025 17:42 IST2025-03-14T17:41:38+5:302025-03-14T17:42:03+5:30

आरोपी बुलेट व मोटार सायकलचे मोठमोठ्याने सायन्लेसर वाजवत होते

Don't make loud noises about bullet A gang of 7 people brutally attacked a person in pimpri chinchwad | बुलेटचा मोठमोठ्याने आवाज करू नका; ७ जणांच्या टोळक्याचा एकावर खुनी हल्ला

बुलेटचा मोठमोठ्याने आवाज करू नका; ७ जणांच्या टोळक्याचा एकावर खुनी हल्ला

पिंपरी : बुलेट व दुचाकीचे मोठमोठ्याने आवाज करू नका, असे सांगितल्‍याच्‍या कारणावरून सात जणांच्‍या टोळक्‍याने एकावर खुनी हल्‍ला केला. तर तिथे असलेल्‍या चारचाकी वाहन आणि तीन दुचाकींचीही तोडफोड केली. ही घटना बुधवारी रात्री दहाच्‍या सुमारास घडली. पोलिसांनी सातही आरोपींना अटक केली आहे.

एमआयडीसी भोसरी पोलिसांनी दिलेल्‍या माहितीनुसार, दिनेश जालिंदर सस्‍ते, (वय ३०, रा. सस्तेवाडी मोशी) यांनी फिर्याद दिली आहे. त्यानुसार, साहिल संपत भोर (वय १९, रा. चाकण रोड, चर्‍होली), रामेश्वर शाम टेकाळे (वय २०), रोहित एकनाथ इंगोले (वय १९, दोघेही रा. धुंडरे आळी, आळंदी), अभय सुभाष कालेल (वय २२, रा. काटे कॉलणी चर्‍होली), अनिल प्रकाश राठोड (वय २७, रा. डुडुळगाव), चैतन्य लक्ष्मण पांचाळ (वय २०), शुभम नागनाथ कुंभार (वय २०, दोघेही रा. केळगाव) यांना अटक केली आहे. 

वाहनांची तोडफोड केली

फिर्यादी दिनेश सस्‍ते हे त्‍यांचे चुलते भानुदास यांच्या वाशिंग सेंटर जवळ अंकित दिवाकर व मित्रांसोबत गप्पा मारीत बसले होते. त्‍यावेळी आरोपी बुलेट व मोटार सायकलचे मोठमोठ्याने सायन्लेसर वाजवत होते. त्‍यावेळी फिर्यादी व त्‍यांच्‍या मित्रांनी त्‍यांना विरोध केला. यामुळे चिडलेले आरोपी पाच दुचाकीवरून हातात कोयता, कुर्‍हाड व लाकडी दांडके घेऊन आले. त्‍यांनी फिर्यादी, त्‍यांचे मित्र आणि वाॅशिंग सेंटरवर काम करणाऱ्यास मारहाण केली. तेथील वाहनांची तोडफोड केली होती.

 

Web Title: Don't make loud noises about bullet A gang of 7 people brutally attacked a person in pimpri chinchwad

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.