रिंगरोडसाठी भंडारा डोंगराला बोगदा पाडू नका, रेखांकनात बदल करा; सार्वजनिक बांधकाम मंत्र्यांसोबत बैठक

By ऑनलाइन लोकमत | Published: June 24, 2021 10:43 PM2021-06-24T22:43:18+5:302021-06-24T22:43:45+5:30

मावळातील वारकरी संप्रदायाने रिंगरोडच्या रेखांकनात बदल करण्याची मागणी केली आहे. याबाबत मुंबईत बैठक झाली.

Don’t tunnel down for Bhandara mountain for the ringroad; Meeting with the Minister of Public Works | रिंगरोडसाठी भंडारा डोंगराला बोगदा पाडू नका, रेखांकनात बदल करा; सार्वजनिक बांधकाम मंत्र्यांसोबत बैठक

रिंगरोडसाठी भंडारा डोंगराला बोगदा पाडू नका, रेखांकनात बदल करा; सार्वजनिक बांधकाम मंत्र्यांसोबत बैठक

Next

पिंपरी : महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाने (एमएसआरडीसी) पुणे जिल्ह्याच्या ग्रामीण भागात प्रस्तावित केलेला ११० मीटर रुंद रिंगरोड मावळ तालुक्यातील श्री क्षेत्र भंडारा डोंगराला भेदून किंवा बोगदा पाडून जात असल्याचे नकाशामध्ये दर्शविले आहे. डोंगराला बोगदा करण्याच्या मुद्यावरून नगरविकास, सार्वजनिक बांधकाम मंत्री एकनाथ शिंदे यांच्या समवेत बैठक झाली. ‘‘योग्य मार्ग काढला जाईल. श्रद्धास्थानाच्या बाबतीत वारकऱ्यांच्या कोणत्याही प्रकारची भावना दुखावली जाणार नाही असे बैठकीत शिंदे यांनी सांगितले.

मावळातील वारकरी संप्रदायाने रिंगरोडच्या रेखांकनात बदल करण्याची मागणी केली आहे. याबाबत मुंबईत बैठक झाली.  मंत्री एकनाथ शिंदे, खासदार खासदार श्रीरंग बारणे, एमएसआरडीसीचे व्यवस्थापकीय संचालक राधेश्याम मोपलवार उपस्थित होते.

खासदार बारणे म्हणाले,  श्री क्षेत्र भंडारा डोंगर हे जगदगुरू संत तुकाराम महाराजांचे अत्यंत पवित्र असे  ठिकाण आहे. भंडारा डोंगरास महाराष्ट्र सरकारने तीर्थ क्षेत्र घोषित करून तेथे विविध विकास कामे केली आहेत. हे स्थान श्री क्षेत्र देहू या संस्थानपासून जवळ आहे. त्यामुळे तेथे महाराष्ट्रातून व देश-विदेशातून पर्यटक दर्शनासाठी येतात. श्री क्षेत्र भंडार डोंगराला बोगदा करण्यास वारकºयांचा व संस्थानचा विरोध आहे. प्रस्तावित रिंगरोड श्री क्षेत्र भंडारा डोंगराला भेदून जात आहे. त्यासाठी डोंगराला बोगदा पाडावा लागत असल्याचे नकाशात दिसून येत आहे. त्याला वारकरी, सांप्रादाय क्षेत्रातील नागरिकांचा मोठा विरोध आहे. ’’

त्यावर मंत्री शिंदे म्हणाले, ‘‘यातून योग्य मार्ग काढला जाईल. श्रद्धास्थानाच्या बाबतीत  वारकऱ्यांची कोणत्याही प्रकारची भावना दुखावली जाणार नाही.’’

Web Title: Don’t tunnel down for Bhandara mountain for the ringroad; Meeting with the Minister of Public Works

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.