कामाचे मिळतील दुप्पट पैसे! मेडिकल चालकाने टास्क फ्रॉडमध्ये गमावले नऊ लाख रुपये
By रोशन मोरे | Published: September 9, 2023 04:20 PM2023-09-09T16:20:23+5:302023-09-09T16:20:42+5:30
ही घटना चार मार्च ते २१ मार्च २०२३ या कालावधीत भोसरी घडली...
पिंपरी : या कामात चांगले पैसे मिळतील. आणि गंतवणूक केली तर पैसे दुप्पट होतील, असे अमिष दाखवून सायबर भामट्यांनी मेडिकल चालकाची तब्बल आठ लाख ९६ हजार रुपयांची फसवणूक केली. ही घटना चार मार्च ते २१ मार्च २०२३ या कालावधीत भोसरी घडली. या प्रकरणी शुक्रवारी (दि.८) सुरज बाबासाहेब माने (वय२५, रा. भोसरी) यांनी भोसरी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली. त्यानुसार पोलिसांनी सुरज यांच्या संपर्क साधणाऱ्यांवर गुन्हा दाखल केला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी घरी असताना टेलिग्रामद्वारे तीन जणांनी संपर्क साधला. या वेब पेजच्या माध्यमातून दिलेले टास्क पूर्ण केले तर , तत्काळ अधिक पैसे मिळतील. तसेच या टास्कमध्ये पैसे गुंतवले तर आकर्षक परतावा मिळेल, असे अमिष दाखवले. त्यामुळे सुरज यांनी टप्याटप्याने तब्बल आठ लाख ९६ हजार रुपयांची गुंतवणूक केली. मात्र, या गुंतवणुकीची मूळ रक्कम तसेच परतावा न देता त्यांची फसवणूक करण्यात आली. असे फिर्यादीत नमूद आहे.