एका वर्षात दुप्पट पैसे देण्याचे आमिष ; १३ लाखांची फसवणूक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 30, 2021 01:10 AM2021-03-30T01:10:25+5:302021-03-30T01:10:58+5:30
वाकड मध्ये गुन्हा दाखल
पिंपरी : एका वर्षात दुप्पट परतावा देण्याचे आमिष दाखवून १३ लाख रुपये गुंतवण्यास सांगितले. मात्र मुदतीनंतर पैसे न देता फसवणूक केली. वाकड येथे ऑगस्ट २०१७ ते २७ मार्च २०२१ या कालावधीत फसवणुकीचा हा प्रकार घडला.
सचिन खंडेराव गायकवाड, अश्विनी ऊर्फ बाई सचिन गायकवाड, खंडेराव यादवराव गायकवाड (सर्व रा. सिंहगड रोड, पुणे) अशी गुन्हा दाखल झालेल्यांची नावे आहेत. याबाबत जोतिबा मारुती रोकडे (वय ३८, रा. गुजरनगर, थेरगाव) यांनी वाकड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपींनी संगनमत करून फिर्यादी यांना गुंतवणुकीवर एका वर्षात दुप्पट परतावा देण्याचे आमिष दाखवले. त्यापोटी आरोपींनी फिर्यादीकडून १३ लाख रुपये घेतले. मात्र गुंतवलेले पैसे आणि आश्वासित मोबदला यापैकी आरोपींनी काहीही न देता फिर्यादीची फसवणूक केली.