सहा महिन्यांत दाम दुप्पट; आमिष दाखवून कोट्यवधींचा गंडा

By नारायण बडगुजर | Published: September 4, 2022 04:20 PM2022-09-04T16:20:35+5:302022-09-04T16:20:45+5:30

फसवणूक प्रकरणी पिंपरी पोलीस ठाण्यात दोन गुन्हे दाखल

Double the price in six months Scam of crores by showing bait | सहा महिन्यांत दाम दुप्पट; आमिष दाखवून कोट्यवधींचा गंडा

सहा महिन्यांत दाम दुप्पट; आमिष दाखवून कोट्यवधींचा गंडा

Next

पिंपरी : कंपनीत गुंतवणूक केल्यास मोठा आर्थिक फायदा करून देण्याचे सांगितले. तसेच सहा महिन्यात दामदुप्पट करून देण्याचे आमिष दाखवून मुदत ठेव स्वीकारल्या. यातून दीड कोटी रुपयांची फसवणूक केली. हा प्रकार २०१९ ते २०२१ या कालावधीत चिंचवड येथे घडला. पिंपरी पोलीस ठाण्यात याप्रकरणी बुधवारी (दि. ३१) दोन वेगवेगळ्या गुन्ह्यांची नोंद करण्यात आली. 

राजेंद्र आनंदराव पाटील (वय ४६, रा. पिंपरीगाव) यांनी याप्रकरणी बुधवारी (दि. ३१) पिंपरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. त्यानुसार राहुल गुलाबसिंग जाखड (रा. चिंचवड) आणि जेबीसी कॅपिटल प्रा. ली.च्या इतर संचालकांच्या विरोधात पोलिसांनी गुन्हा दाखल केला. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी राहुल याने फिर्यादीला कंपनीत गुंतवणूक केल्यास मोठा आर्थिक फायदा करून देतो, असे आमिष दाखवले. आरोपीवर विश्वास ठेऊन फिर्यादीने ३५ लाख रुपयांची गुंतवणूक केली. मात्र आरोपींनी फिर्यादीला परतावा अथवा गुंतवलेली रक्कम परत न करता आर्थिक फसवणूक केली.

दुसऱ्या प्रकरणात रवींद्र मुरलीधर हगवणे (वय ४६, रा. मोशी) यांनी फिर्याद दिली. त्यानुसार राहुल गुलाबसिंग जाखड, रामहरी ज्ञानदेव मुंढे, सुनील जनार्दन झांबरे, माधव रघुनाथ चासकर, विश्वास रामचंद्र भोर, नवनाथ एकनाथ रेपाळे यांच्या विरोधात गुन्हा दाखल केला. आरोपींनी जेबीसी कॅपिटल प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीत गुंतवणूक केल्यास दहा महिन्यात दहा टक्के परतावा योजनेत आणि सहा महिन्यात दाम दुप्पट मुदत ठेवीच्या योजनेत गुंतवणूक करण्याचे आमिष दाखवले. फिर्यादी आणि त्यांच्या पत्नीने साडेसात लाख रुपये गुंतवणूक केली. त्यांना १२ लाख ३१ हजार ६०० रुपये एकूण परतावा देणे आवश्यक असताना आरोपींनी तो न देता फसवणूक केली. 

भारतीय रिझर्व्ह बॅंकेचा दाम दुप्पट मुदत ठेवी स्वीकारण्याचा परवाना नसताना आरोपींनी फिर्यादीकडून मुदत ठेवी स्वीकारल्या. तसेच पिंपरी-चिंचवड येथील कंपनीचे कार्यालय बंद करून आरोपी पळून गेले. फिर्यादीसह फिर्यादीच्या ओळखीचे पिंपरी-चिंचवड येथील इतर लोक यांचे एकूण एक कोटी ३३ लाख १३ हजार ६४३ रुपयांची फसवणूक केली, असे फिर्यादीत नमूद आहे.

Web Title: Double the price in six months Scam of crores by showing bait

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.