भोसरीत चायनीज सेंटरमध्ये मद्यपान; तिघांवर गुन्हा दाखल
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 22, 2021 12:43 PM2021-02-22T12:43:50+5:302021-02-22T12:44:05+5:30
लोकांना दारू पिण्यासाठी हॉटेलमधील जागेचा विनापरवाना बेकायदेशीरपणे वापर करू दिला जात असल्याची माहिती पोलिसांना मिळाली.
पिंपरी : परवाना नसताना चायनीज सेंटरमध्ये लोकांना दारू पिण्यासाठी बसू दिल्याने तीन जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. भोसरी येथे रविवारी ही कारवाई करण्यात आली.
स्वप्नील विलास भाकरे (वय ३५, रा. चिंचवड), अर्जुनखंड भंडारे (वय ३२, रा. भोसरी), रुपेश रमेश बैचे (वय २८, रा. आळंदी रोड, भोसरी), अशी गुन्हा दाखल झालेल्या आरोपींची नावे आहेत. पोलीस कर्मचारी धोंडीराम बालाजी केंद्रे (वय ३३) यांनी याप्रकरणी भोसरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी भाकरे त्याच्या मालकीचे चंद्रदीप चायनीज, आरोपी भंडारे त्याच्या मालकीचे ओम साई स्नॅक्स सेंटर, तसेच आरोपी बैचे यांच्या मालकीचे एस. पी. चायनीज, अशी दुकाने आहेत. लोकांना दारू पिण्यासाठी हॉटेलमधील जागेचा विनापरवाना बेकायदेशीरपणे वापर करू दिला जात असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. त्यानुसार पोलिसांनी कारवाई करून आरोपींविरोधात गुन्हा दाखल केला.