सांगवी येथे चालकाला मारहाण करून पीएमपी बसच्या फोडल्या काचा; दोन जणांना अटक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 1, 2021 21:43 IST2021-02-01T21:43:23+5:302021-02-01T21:43:31+5:30
आरोपींनी विनाकारण शिवीगाळ करून फिर्यादीला मारहाण केली.

सांगवी येथे चालकाला मारहाण करून पीएमपी बसच्या फोडल्या काचा; दोन जणांना अटक
पिंपरी : पीएमपीएमएल बस अडवून बसच्या चालकाला मारहाण केली. तसेच बसच्या काचा फोडल्या. जुनी सांगवी येथे शनिवारी (दि. ३०) सायंकाळी ही घटना घडली. याप्रकरणी दोन जणांना अटक करण्यात आली आहे.
स्वप्नील बाळासाहेब तिखे (वय २२), शुभम अरविंद जाधव (वय २१, दोघे रा. पाषाण, पुणे) अशी अटक केलेल्या आरोपींची नावे आहेत. पीएमपीएमएल बसचे चालक श्रीकांत दत्तात्रय भोकरे (वय ३१, रा. फुरसुंगी) यांनी सांगवी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. फिर्यादी हे स्वारगेट-सांगवी बसवर कर्तव्यावर होते. सांगवी येथून पुन्हा स्वारगेट येथे बस घेऊन जात असताना जुनी सांगवी येथे वेताळ महाराज मंदिराजवळ दुचाकीवरून आरोपी आले. आरोपींनी विनाकारण शिवीगाळ करून फिर्यादीला मारहाण केली. तसेच बसच्या काचा फोडून नुकसान करून सरकारी कामात अडथळा निर्माण केला.