वाहनचालकांनो सावधान! पिंपरी चिंचवडमध्ये या रस्त्यांवर खड्ड्यांमुळे अपघाताचा धोका

By नारायण बडगुजर | Published: July 22, 2022 02:21 PM2022-07-22T14:21:39+5:302022-07-22T14:23:28+5:30

पावसामुळे खड्डेमय झाले रस्ते...

Drivers beware Danger of accidents due to potholes on these roads | वाहनचालकांनो सावधान! पिंपरी चिंचवडमध्ये या रस्त्यांवर खड्ड्यांमुळे अपघाताचा धोका

वाहनचालकांनो सावधान! पिंपरी चिंचवडमध्ये या रस्त्यांवर खड्ड्यांमुळे अपघाताचा धोका

Next

पिंपरी : पावसामुळे रस्त्यांची दुरवस्था झाली आहे. त्यामुळे वाहतुकीचा खोळंबा होऊन कोंडी होत आहे. तसेच काही ठिकाणी अपघात देखील होत आहेत. त्यासाठी वाहतूक पोलिसांनी पुढाकार घेत काही ठिकाणचे खड्डे बुजविले. मात्र खड्डे मोठ्या संख्येने असल्याने पोलिसांची अडचण झाली. त्यामुळे तत्काळ खड्डे बुजवून रस्ता दुरुस्ती करण्यात यावी, अशा आशयाचे पत्र पिंपरी-चिंचवड पोलिसांकडून प्रशासनाकडे करण्यात सादर करण्यात आले आहे. त्यानुसार तात्पुरती उपाययोजना म्हणून काही ठिकाणी खडी, मुरूम टाकण्यात आला आहे. मात्र, अनेक रस्त्यांवर अद्याप खड्डे आहेत. त्यामुळे वाहनचालकांनी खबरदारी घ्यावी, असे आवाहन पोलिसांनी केले आहे.  

पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्तालयांतर्गत द्रुतगती मार्ग, राष्ट्रीय महामार्ग, राज्यमार्ग तसेच जिल्हा मार्ग देखील आहेत. पावसामुळे या रस्त्यांवर खड्डे झाले आहेत. त्याबाबत पोलिसांनी राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण, महापालिका, पीएमआरडीए, एमआयडीसी, जिल्हा परिषद, सार्वजनिक बांधकाम विभाग यासह विविध आस्थापनांकडे निवेदन दिले आहे. संबंधित आस्थापनेच्या अखत्यारित येणाऱ्या रस्त्यांची दुरुस्ती करण्यात यावी, अशी सूचना पोलिसांनी केली आहे. यापूर्वीही पोलिसांनी रस्ते दुरुस्ती, रुंदीकरण, साईडपट्ट्यांची दुरवस्था प्रशासनाच्या निदर्शनास आणून दिली आहे. मात्र, तरीही प्रशासनाकडून त्याकडे दुर्लक्ष करण्यात येत आहे.    

पावसामुळे खड्डेमय झालेले वाहतूक विभागनिहाय रस्ते

हिंजवडी  
१) कस्तुरी चौक ते हिंजवडी गावठाण मार्गे छत्रपती शिवाजीमहाराज चौक
२) बेंगळुर -मुंबई महामार्गाचा सेवारस्ता

वाकड  
१) वाकडनाका ते कस्पटे चौक
२) बिर्ला हाॅस्पिटल ते विनोदे काॅर्नर चौक
३) काळेवाडी फाटा ते पुनावळे पूल

चिंचवड
१) अहिंसा चौक, चिंचवड स्टेशन
२) वेताळनगर झोपडपट्टी
३) चिंचवड स्टेशन पूल

देहूरोड
१) मुकाई चौक ते विकासनगर रस्ता
२) पुनावळे पूल ते साईनगर रस्ता

भोसरी
१) सद्गुरुनगर चौक ते मोशी टोलनाका

पिंपरी
१) पुणे-मुंबई महामार्गाचा सेवा रस्ता
२) पिंपरीगावातील अंतर्गत रस्ते
३) पिंपरी कॅम्प, बाजारपेठ
४) जमतानी चौक, जिजामाता चौक
५) मोरवाडी
६) मोहननगर
७) वल्लभनगर
८) संत तुकाराम नगर
९) नेहरुनगर
१०) केएसबी चौक परिसरातील रस्ते

निगडी
१) त्रिवेणी नगर चौक
२) के. सदन चौक

चाकण व महाळुंगे
१) तळेगाव-चाकण- शिक्रापूर महामार्ग
२) एमआयडीसीतील अंतर्गत रस्त
३) महाळुंगे पोलीस चौकी शेजारील अरुंद पूल
४) महाळुंगे गाव कमान परिसर
५) खालुंब्रे
६) सारा सिटी चौक परिसर
७) वाघजाईनगर
८) एचपी चौक परिसर  

तात्पुरती डागडुजी
पावसामुळे रस्त्यांची दुरवस्था झाल्याने काही ठिकाणी पोलिसांनी मुरुम, माती टाकून खड्डे बुजविले. मात्र, पावसामुळे मुरूम आणि माती वाहून जाऊन पुन्हा खड्डे होत आहेत. या पोलिसांनी संबंधित विभागाकडे पत्रव्यवहार केला. त्यानुसार प्रशासनाने काही ठिकाणी तात्पुरती डागडुजी करून खड्डे बुजवले आहेत.

मेट्रो प्रकल्प, खोदकामामुळे रस्त्यांची ‘वाट’
हिंजवडी आणि मोरवाडी येथे मेट्रो प्रकल्पाचे काम सुरू आहे. त्यासाठी खोदकाम करण्यात आले असून
वाहतुकीला त्याचा अडथळा होत आहे. तसेच शहरांतर्गत काही रस्त्यांवर देखील खोदकाम केलेले आहे. त्यात पावसाची भर पडली असून, रस्त्यांची दुरवस्था झाली आहे.

खड्डे व रस्त्यांची दुरवस्था याबाबत संबंधित विभागांना सूचित केलेले आहे. वाहतूक पोलिसांनी काही ठिकाणचे खड्डे बुजवले. पावसाने उघडीप दिल्यानंतर खड्डे बुजवून रस्ते दुरुस्ती करण्यात येईल, असे संबंधित विभागांकडून सांगण्यात आले आहे. अपघात टाळण्यासाठी वाहनचालकांनी खबरदारी घ्यावी.
- आनंद भोईटे, पोलीस उपायुक्त, वाहतूक शाखा, पिंपरी-चिंचवड

 

Web Title: Drivers beware Danger of accidents due to potholes on these roads

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.