वाहनचालकांनीच घातला वाहतूक पोलिसांना गंडा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 7, 2017 06:44 AM2017-10-07T06:44:15+5:302017-10-07T06:44:25+5:30

वाहतुकीच्या नियमभंगामुळे दंड ठोठावलेल्या सव्वा लाखाहून अधिक वाहनचालकांनी दंडाची तब्बल ४ कोटी रुपयांहून अधिक रक्कम भरली नसल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. विशेष म्हणजे

Driving the traffic police | वाहनचालकांनीच घातला वाहतूक पोलिसांना गंडा

वाहनचालकांनीच घातला वाहतूक पोलिसांना गंडा

Next

विशाल शिर्के
वाहतुकीच्या नियमभंगामुळे दंड ठोठावलेल्या सव्वा लाखाहून अधिक वाहनचालकांनी दंडाची तब्बल ४ कोटी रुपयांहून अधिक रक्कम भरली नसल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. विशेष म्हणजे या पैकी एकाही वाहनचालकाने प्रामाणिकपणे नंतर दंडाची रक्कम जमा केलेली नाही.
सिग्नल तोडणे, एकेरी वाहतुकीतून विरुद्ध दिशेने वाहन दामटणे, वाहन परवाना आणि हेल्मेट नसणे, सिटबेल्ट न लावणे अशा विविध वाहतुकीच्या नियमभंगप्रकरणी दररोज हजारो वाहनचालकांना कारवाईला सामोरे जावे लागते. मार्च २०१७ पासून शहरात वाहतूक नियमभंगाचा दंड
भरण्यासाठी ई-चलन सुरु करण्यात आले आहे. ई चलन यंत्रामार्फत एटीएम कार्ड स्वाइप करुन दंडाची रक्कम भरता येते. तसेच आॅफलाइन पद्धतीने एका मोबाइल कंपनीच्या स्टोअर्समध्येच पैसे भरता येतात. परिणामी जर एखाद्या वाहनचालकाच्या एटीएममध्ये पुरेसे पैसे नसतील, अथवा त्याच्याकडे एटीएम नसेल आणि आॅफलाइनचे स्टोअर्सदेखील जवळ नसल्यास संबंधित वाहनचालकांना नंतर येऊन दंड भरण्याची मुभा दिली जाते. अशी सर्व प्रकरणे ‘अनपेड’ या शीर्षकाखाली जातात. ई-चलन पद्धती सुरु झाल्यापासून शहरात अनपेड वाहनचालकांची संख्या वाढत आहे. शहरात २९ मार्च २०१७ ते ३० जुलै २०१७ या कालावधीत १ लाख ७१ हजार ७०३ वाहनचालकांनी वाहतूक नियमभंगप्रकरणी ३ कोटी ८६ लाख ८५ हजार ८२५ रुपयांचा दंड भरला
होता. याच कालावधीत १ लाख ३४ हजार १०८ वाहनचालकांनी ४ कोटी ३८ लाख १२ हजार १०५ रुपये रक्कम भरली नव्हती.

दंडात्मक कारवाई केलेल्या अनपेड श्रेणीतील एका वाहनावर पाचपेक्षा अधिक नियमभंग असल्यास, त्यांना दंडाची नोटीस बजावण्याचे धोरण पोलिसांच्या वाहतूक विभागाने स्वीकारले आहे. त्यामुळे बहुतांश वाहनचालकांची दंडातून आपोआपच सुटका होणार आहे. वाहतूक नियमभंग केल्यानंतर तत्काळ दंड भरणाºयांपेक्षा, दंड न भरणाºया वाहनचालकांच्या दंडाची रक्कम अधिक आहे. वाहतूक विभागाकडे ३० जुलै २०१७ अखेर ई-चलनद्वारे ३ कोटी ८६ लाख ८५ हजार ८२५ रुपयांचा दंड जमा झाला होता. तर अनपेड शीर्षकाखालील दंडाची रक्कम ही ४ कोटी ३८ लाख १२ हजार १०५ रुपये होती. या अनपेड केसपैकी एकाही व्यक्तीने नंतर दंडाची रक्कम भरलेली नाही.
 

Web Title: Driving the traffic police

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.