खड्ड्यांमुळे वाहनचालकांची कसरत

By admin | Published: July 17, 2017 04:06 AM2017-07-17T04:06:52+5:302017-07-17T04:06:52+5:30

वल्लभनगर येथील एसटी आगारामध्ये मोठ्या प्रमाणावर खड्डे पडले असून, रस्त्याची चाळण झाली आहे. तसेच वल्लभनगर

Driving workforce due to potholes | खड्ड्यांमुळे वाहनचालकांची कसरत

खड्ड्यांमुळे वाहनचालकांची कसरत

Next

लोकमत न्यूज नेटवर्क
नेहरूनगर : वल्लभनगर येथील एसटी आगारामध्ये मोठ्या प्रमाणावर खड्डे पडले असून, रस्त्याची चाळण झाली आहे. तसेच वल्लभनगर भुयारी मार्ग, फुलेनगर येथील रस्त्यांवर पडलेल्या खड्ड्यांमुळे वाहनचालकांना कसरत करावी लागत आहे.
वल्लभनगर आगारातील खड्ड्यांमुळे एसटीचालकांना व इतर नागरिकांना त्रास सहन करावा लागत आहे. या खड्ड्यांमध्ये पावसाच्या पाण्याची डबकी तयार होत आहे. आगारामध्ये दररोज अनेक एसटी बस ये-जा करीत असतात. त्याच बरोबर दिवसभरात शेकडो नागरिक नातेवाईक किंवा मित्र परिवाराला सोडण्यासाठी किंवा घेण्यासाठी येत असतात. त्यांनाही या खड्ड्यांमुळे त्रास सहन करावा लागत आहे. यासह वल्लभनगर भुयारी मार्गामध्येदेखील जागोजागी खड्डे पडले असून, या भुयारी मार्गामध्ये नेहमी अंधार असल्यामुळे दुचाकीस्वारांना हा खड्डा व्यवस्थित दिसत नसल्यामुळे खड्ड्यांमध्ये दुचाकी जाऊन अपघात होण्याची शक्यता वाढली आहे.
या खड्ड्यांची तातडीने दुरुस्ती करण्याची मागणी होत आहे.

Web Title: Driving workforce due to potholes

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.