पोलिसांचे ई-मशिन दिले फेकून
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 20, 2018 07:10 AM2018-02-20T07:10:57+5:302018-02-20T07:11:01+5:30
वाहनचालक वाहतूक पोलिसांशी अरेरावी करण्याच्या घटना वारंवार घडू लागल्या आहेत. सांगवी येथील वाहतूक विभागाच्या रेश्मा पवार, तसेच त्यांच्या
पिंपरी : वाहनचालक वाहतूक पोलिसांशी अरेरावी करण्याच्या घटना वारंवार घडू लागल्या आहेत. सांगवी येथील वाहतूक विभागाच्या रेश्मा पवार, तसेच त्यांच्या सहकाºयांना वाहन चालकाच्या उद्धटपणाचा कटू अनुभव रविवारी आला. एका वाहनचालकाने त्यांच्या हातातील ई बिलिंग मशिन फेकून दिले.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, धनंजय नागेश वळसदीकर (वय २६, रा. भेगडे आळी, तळेगाव) हा आरोपी रविवारी सकाळी दहाच्या सुमारास काळेवाडीकडून शिवार चौकाकडे जात होता. त्या वेळी साई चौक ते जगताप डेअरी चौक दरम्यान पोलीस नाईक जगताप वाहतूक नियमन करीत होते. रहदारीस अडथळा होईल, अशा पद्धतीने रस्त्यात आरोपीने वाहन थांबवले. परिणामी वाहतूककोंडी झाली. त्या वेळी वाहतूक विभाग सांगवी येथील पोलीस शिपाई रेश्मा पवार यांंनी, तसेच जगताप यांनी आरोपीस वाहन बाजूस घेण्यास सांगितले. तसेच दंडाची पावती घ्यावी लागेल, असे सूचित केले. दरम्यान, आरोपीने त्यांच्याशी उद्धट भाषा वापरली. असभ्य वर्तन करून त्यांना ढकलून दिले. तसेच जगताप यांच्या हातातील ई-बिलिंग मशिन हिसकावून फेकून दिले. तुम्हाला पावती करण्याचा अधिकार नाही, असे म्हणत सरकारी कामात अडथळा आणला, अशा स्वरूपाची फिर्याद रेश्मा पवार यांनी दिली आहे.