पर्यटनासाठी गेलेले दोन जिवलग मित्र कासारघाई धरणात बुडाले
By ऑनलाइन लोकमत | Published: March 22, 2019 01:48 PM2019-03-22T13:48:17+5:302019-03-22T13:49:13+5:30
कासारसाई धरणाच्या पाणलोट क्षेत्रात ते दोघे गुरुवारी दुपारी पोहण्यासाठी उतरले.मात्र, पाण्याच्या पातळीचा अंदाज न आल्याने ते दोघेही पाण्यात बुडाले.
तळेगाव दाभाडे: कुसगाव जवळील कासारसाई धरणात धुलीवंदनाच्या दिवशी पर्यटनासाठी आलेले दोघे जिवलग मित्र पाण्यात बुडून मरण पावल्याची हृदयद्रावक घटना गुरुवारी (दि. २१) दुपारी घडली.
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, ऋत्विक संजय गिरी (वय-२१ रा.बिजलीनगर, चिंचवड,पुणे)आणि शुभम टेकचंद राहांगडाले (वय-२१,सध्या रा.वाकड,,पुणे मूळ रा.गोरेगाव ,ता.गोरेगाव, जि.गोंदिया,नागपूर) अशी मृतांची नावे आहेत. ते दोघेही जिवलग मित्र होते.कासारसाई धरणाच्या पाणलोट क्षेत्रात ते दोघे गुरुवारी दुपारी पोहण्यासाठी उतरले.मात्र, पाण्याच्या पातळीचा अंदाज न आल्याने ते दोघेही पाण्यात बुडाले. सुदुंबरे येथील एनडीआरएफ पथकाने सायंकाळी दोघांचेही मृतदेह बाहेर काढले. तळेगाव प्राथमिक आरोग्य केंद्राचे डॉ.प्रवीण कानडे यांनी शवविच्छेदन केल्यानंतर मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आले. ऋत्विक हा कोथरूड येथील
एमआयटी महाविद्यालयात इंजिनिअरिंगच्या दुसऱ्या वर्गात शिक्षण घेत होता. शुभम राहांगडाले हे हडपसर येथील एका कंपनीत कामास होते. पुढील तपास तळेगाव पोलीस करीत आहेत.