Pune: सात कोटींचे अंमली पदार्थ जप्त, ८२ आरोपींना अटक; २०२३ मधील पुणे पोलिसांची कारवाई

By रोशन मोरे | Published: June 26, 2023 03:46 PM2023-06-26T15:46:17+5:302023-06-26T15:46:28+5:30

त्याच्या ५८ केस दाखल केल्या असून तब्ब ८३ आरोपींना अटक केली आहे...

Drugs worth 7 crore seized, 82 accused arrested; Action of Pune Police in 2023 | Pune: सात कोटींचे अंमली पदार्थ जप्त, ८२ आरोपींना अटक; २०२३ मधील पुणे पोलिसांची कारवाई

Pune: सात कोटींचे अंमली पदार्थ जप्त, ८२ आरोपींना अटक; २०२३ मधील पुणे पोलिसांची कारवाई

googlenewsNext

पुणे : अंमली पदार्थांची वाहतूक करणे, ते जवळ बाळगणे अथवा त्याचा व्यापार करणे कायद्याने गुन्हा आहे. अंमली पदार्थांचे व्यसन करणारे देखील पोलिसांच्या रडावर आहेत. २०२३ या चालू वर्षात तब्बल सात कोटी रुपयांचे अंमली पदार्थ पुणे पोलिसांच्या अंमली पदार्थ विरोधी पथकाने जप्त केले आहेत. त्याच्या ५८ केस दाखल केल्या असून तब्बल ८३ आरोपींना अटक केली आहे.

अंमली पदार्थ विरोधी कायद्यान्वये एकूण ५८ केस केल्या आहेत. सात कोटी २४ लाख १९ हजार चारशे पाच रुपये अंमली पदार्थ विरोधी पथकाने केलेल्या कारवाईमध्ये अंमली पदार्थ विरोधी पथकाने केलेल्या कारावाईमध्ये ७७ लाख ८३ हजार ३६५ रुपये किंमतीचा ३८५ किलो ५८० ग्रॅम गांजा, तीन कोटी ७५ लाख ४५ हजार ८०० रुपये किंमतीचे एक किलो ८७४ ग्रॅम ३१९ मिलीग्रॅम मेफेड्रॉन (एम.डी.), ४० लाख ३५ हजार रुपये किंमतीचे २०१ ग्रॅम ३९० मिलीग्रॅम कोकेन, ४२ लाख ६८ हजार ९४० रुपये किंमतीचे तीन किलो २८५ ग्रॅम ७९० मिलीग्रॅम चरस, ७६ हजार ५० रुपये किंमतीचे पाच किलो सात ग्रॅम आफिम बोडाचा दोड्डा चुरा व पावडर, ८ लाख ३४ हजार ९०० रुपये किंमतीचे ४१७ ग्रॅम ४५० मिलीग्रॅम आफिम, ७ लाख १,३५० रुपये किंमतीचे कॅथा इडुलिस (खत), १ कोटी १८ लाख ६४ हजार ३०० रुपये किंमतीचे ४२ ग्रॅम २९५ मिलीग्रॅम एल.एस.डी. हे अंमली पदार्थ, १ लाख ७६ हजार ५०० रुपये किंमतीचा १८ ग्रॅम ४७६ एम.डी.एम.ए. ४० लाख ३३ हजार २०० रुपये किंमतीचा ३३६ ग्रॅम ०१ मिलीग्रॅम ब्राऊन शुगर पोलिसांनी जप्त केले होते.

Web Title: Drugs worth 7 crore seized, 82 accused arrested; Action of Pune Police in 2023

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.