सजावट स्पर्धेला खोडा; महापालिकेला विसर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 16, 2018 02:31 AM2018-09-16T02:31:25+5:302018-09-16T02:31:46+5:30

गेल्या वर्षीच्या गणेशोत्सव स्पर्धेचे रखडले बक्षीस वितरण

Dry the decoration tournament; Forgot to the municipality | सजावट स्पर्धेला खोडा; महापालिकेला विसर

सजावट स्पर्धेला खोडा; महापालिकेला विसर

Next

पिंपरी : महापालिकेच्या वतीने घेण्यात येणाऱ्या गणेशोत्सव सजावट स्पर्धेस सत्ताधारी भाजपाने खोडा घातला आहे. संस्कृती आणि सांस्कृतिक रक्षणाचे गोडवे गाणाºया भाजपाला परंपरांचा विसर पडला आहे. गणेश मंडळ देखावा स्पर्धेचे बक्षीसवितरण त्वरित करावा, अशी मागणी होत आहे.
पिंपरी-चिंचवड शहरात सांस्कृतिक चळवळ वाढीस लागावी, सामाजिक एकोपा जपला जावा, पर्यावरण, स्वच्छतेबाबत जनजागृती व्हावी. या हेतूने दरवर्षी गणेशोत्सवाच्या काळात सार्वजनिक गणेश मंडळांना प्रोत्साहान मिळावे त्यातून सामाजिक प्रबोधन व्हावे या हेतूने विधायक प्रबोधनात्मक देखावे सादर केले जावेत त्यासाठी पालिकेच्या वतीने गणेशोत्सव स्पर्धेचे आयोजन केले जाते. समाज प्रबोधनामध्ये उत्कृष्ट ठरलेल्या मंडळांना बक्षीस दिले जाते. बक्षीसवितरण दुसºया वर्षीच्या गणेशोत्सवापूर्वी एक महिन्यापूर्वी केले जाते. त्यामुळे विजेत्या मंडळांना बक्षिसाची रक्कम मंडळास देखावा वा इतर कार्यासाठी उपयोगी पडते. मात्र सत्ताधारी भाजपाला याचा विसर पडला आहे.
गणेशोत्सव सुरू होऊनही महापालिकेचा बक्षीस समारंभ झालेला नाही. महापालिकेने या शहारातील सांस्कृतिक चळवळ वाढीस लागावी म्हणून गेली अनेक वर्षे ही परंपरा कायम होती. यावर्षी महापालिका बक्षीसवितरण समारंभ झालेला नाही.
या पूर्वीची अनेक वर्षांची परंपरा भाजपाने मोडीत काढली आहे. गणेशोत्सव सुरू होण्याअगोदर एक महिना पारितोषिक वितरण केले जाते. याचे कारण म्हणजे बक्षिसाच्या रकमेतून गणेश मंडळांना याचा उपयोग सजावट खर्चासाठी होतो. त्यामुळे शहरातील गणेश मंडळाचे कार्यकर्त्यांमध्ये मोठी नाराजी पसरली आहे.
विरोधी पक्षनेते दत्ता साने म्हणाले,‘‘महापौर आणि आयुक्तांनी लक्ष घालू असे आश्वासन दिले होते़ मात्र या आश्वसनाचा आपणास पूर्णत: विसर पडला असून, मांगल्याचे प्रतीक समजल्या जाणाºया या गणरायालादेखील भूलथापातून सोडले नाही. हे या शहरातील शहरवासीयांचे दुर्दैव आहे.
पालिका व पोलीस प्रशासन यांच्या मार्फत भोसरी येथे शांतता बैठकीमध्येही गणेशमंडळाच्या पदाधिकाºयांनी याबाबत विचारणा केली होती. भाजपा नेत्यांनी न्यायालय आदेश आणि शासनाच्या अध्यादेशाचे कारण पुढे केले. अध्यादेश आल्यानंतरही महापालिकेमार्फत महोत्सव, जयंत्या साजरे केल्या जात आहेत. एवढेच काटकसरीच्या नावाखाली हार, फुले, गुच्छ बंद केल्याची नौटकी केली. काटकसर करीत आहोत हे जनतेला दाखवण्याचा नौटंकी सुरू आहे. भाजपाचे दाखवायचे दात वेगळे आणि खायचे दात वेगळे हे शहरवासीयांना कळून चुकले आहे. यामुळे सांस्कृतिक चळवळीस गालबोट लागले आहे.’’

परंपरा खंडित पडू देणार नाही
पिंपरी : गणेशोत्सव सजावट स्पर्धा आणि पिंपरी-चिंचवड फेस्टिव्हल हे शहराच्या सांस्कृतिक चळवळीत भर टाकणारे उपक्रम आहेत. ही परंपरा पुढे नेत असताना न्यायालयाच्या आदेशाचेही उल्लंघन होणार नाही, याची दक्षता घेणार आहे. परंपरा खंडित केली जाणार नाही, असे सत्तारूढ पक्षनेते एकनाथ पवार यांनी सांगितले.
उच्च न्यायालयाच्या निर्देशामुळे धार्मिक सण आणि महोत्सवांवर टाच आली आहे. त्यामुळे यंदाचा पिंपरी-चिंचवड फेस्टिव्हल होऊ शकला नाही. तसेच गणेशोत्सव सजावट स्पर्धेचे बक्षीसवितरणही होऊ शकले नाही. याबाबत विरोधी पक्षाने टीका केली होती. सोमवारी ढोल वाजवा आंदोलन करण्याचा इशारा दिला आहे.

न्यायालयीन निर्देशाचे पालन करू
यावर सत्तारूढ पक्षनेते पवार म्हणाले,‘‘न्यायालयाचे निर्देश आणि राज्य शासनाच्या सूचनांमुळे सण उत्सवांवर निर्बंध आले आहेत. मात्र, महापालिकेत यापूर्वी सुरू केलेली कोणतीही चांगली गोष्ट बंद केली जाणार नाही. शहराच्या लौकिकात भर टाकणारे उपक्रम सुरूच राहतील. याबाबत कायदा विभागाचे मत, न्यायालयीन निर्देशाचे पालन करूनच निर्णय घेतले जातील.
राष्टÑीय एकात्मतचे प्रतीक गणेशोत्सव आहेत. त्यानिमित्ताने होणारी सजावट स्पर्धा ही सामाजिक भान जपणारी आहे. तसेच देखाव्यांतून प्रबोधनाची पंरपरा जोपासली जाणार आहे. गणेशोत्सव सजावट स्पर्धेचे गतवर्षीचे बक्षीसवितरणही केले जाणार आहे. तसेच फेस्टिव्हलचे नियोजनही केले जाईल.

 

Web Title: Dry the decoration tournament; Forgot to the municipality

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.