ड्राय आय सिंड्रोममुळे अश्रूंचे झाले काटे! डोळ्यांचे वाढते आजार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 31, 2018 03:23 AM2018-01-31T03:23:34+5:302018-01-31T03:23:45+5:30
काही महिन्यांपूर्वीच संगणक क्षेत्रात नोकरी करण्यास सुरुवात केली. मागील काही दिवसांपासून माझ्या डोळ्यांतून पांढरा स्राव बाहेर पडत आहे. तेव्हापासून मला डोळे कोरडे होणे, डोळ्यांना खाज येणे, जळजळणे अशा अनेक विकारांमुळे मी त्रस्त झाले आहे. या विकारांच्या उपचारासाठी नेत्रतज्ज्ञांकडे धाव घेतली असता, त्यांनी मला ड्रय आय सिंड्रोम या आजाराची माहिती दिली. तसेच, मलादेखील या आजाराची लक्षणे असल्याचे नेत्रतज्ज्ञांनी सांगितले.
- प्रीती जाधव-ओझा
पुणे : काही महिन्यांपूर्वीच संगणक क्षेत्रात नोकरी करण्यास सुरुवात केली. मागील काही दिवसांपासून माझ्या डोळ्यांतून पांढरा स्राव बाहेर पडत आहे. तेव्हापासून मला डोळे कोरडे होणे, डोळ्यांना खाज येणे, जळजळणे अशा अनेक विकारांमुळे मी त्रस्त झाले आहे. या विकारांच्या उपचारासाठी नेत्रतज्ज्ञांकडे धाव घेतली असता, त्यांनी मला ड्रय आय सिंड्रोम या आजाराची माहिती दिली. तसेच, मलादेखील या आजाराची लक्षणे असल्याचे नेत्रतज्ज्ञांनी सांगितले.
बदलत्या युगात प्रत्येकाच्या घरी संगणक आणि स्मार्टफोन प्रत्येकाच्या हातात आले आहे. सध्याची तरुणाई २४ तासांतील १२ तास तर मोबाईल इंटरनेटच्या जाळ्यात अडकलेली असते. म्हणूनच काही दिवसांपासून डोळ्यांचे आजार जडलेल्यांची संख्या वाढत चालली आहे. यामध्ये जास्तीत जास्ती तरुणाई, युवक-युवतींचा समावेश आहे.
पूर्वी वयोमानानुसार दृष्टी कुमकुवत होत असे, असा आपला समज आहे. परंतु आता हा समज चुकीचा ठरत असून, तरुणांचीही दृष्टी कमी वयातच कुमकुवत होताना दिसत आहे. त्यांना खूप कमी वयातच चष्म्याचा आधार घ्यावा लागत आहे. त्यामुळे तरुणाईला विविध असे डोळ्यांचे आजार जडू लागले आहेत. अलीकडे डोळ्यांत अश्रू न येण्याच्या म्हणजेच डोळे कोरडे होण्याच्या समस्येत वाढ होत आहे. यालाच ड्राय आय सिंड्रोम असे म्हटले जाते.
घ्यावयाची काळजी?
दिवसभरातून पाच ते सहा वेळा हाताच्या खोलगट भागामध्ये साधे पाणी घेऊन त्यामध्ये डोळ्यांच्या पापण्यांची उघडझाप केल्याने डोळ्यांना व पापण्यांना गारवा मिळतो व डोळे स्वच्छ राहतात.
डोळ्यांच्या पापण्यांची त्वचा पातळ असते व डोळे चोळल्यामुळे पापण्यांना जखम होऊ शकते. हे टाळण्याकरिता पापण्यांना नियमितपणे तेलाचे बोट, कोल्ड क्रीम, व्हॅसलीन हे हळुवारपणे लावणे.
२०-२०-२० नियम-दर २० मिनिटांनी २० फूट कॉम्प्युटर स्क्रीनपासून दूर बघणे.
कॉम्प्युटर स्क्रीनपासून डोळ्यांचे अंतर २२ ते २८ इंच ठेवावे. वीस वेळा पापण्यांची उघडझाप करणे या प्रकारची काळजी घेणे
आवश्यक आहे.
तळपायांना किंवा डोक्याला
तेल लावल्याने डोळ्याला
थंडावा मिळतो.
हे टाळण्याकरिता कॉम्प्युटरवर काम करणाºया व सतत वातानुकूलित वातावरणात काम करणाºया व्यक्तींना ड्राय आय सिंड्रोम आजार जडण्याची शक्यता आहे. तुम्हाला हा आजार टाळायचा असेल तर काही वेळ एसी रूममधून बाहेर जायला हवे. सलग दोन तास कामानंतर १५ मिनिटे डोळ्यांना विश्रांती द्यावी. तसेच डोळे थंड पाण्याने स्वच्छ करणे, या उपायामुळे दृष्टी आणि आरोग्य सदृढ राहण्यास मदत होईल, असे नेत्रतज्ज्ञ डॉ. श्रीकांत केळकर यांनी सांगितले.
आज शहरातील बहुतांश संगणक क्षेत्रातील लोक वातानुकूलित खोली आणि संगणकावर काम करतात. मला संगणकावरती काम दिवसातून ९ ते ११ तास करावे लागते. या वेळेत मला सातत्याने कॉम्प्युटर स्क्रीनकडे पाहावे लागते. त्यामुळे अलीकडे माझ्या डोळ्यांतील अश्रू न येण्याचे प्रमाण वाढून डोळे कोरडे होण्याच्या समस्येत वाढ होत आहे. तसेच डोळे लाल होऊन त्याची जळजळ होते. - भाग्यश्री बिरंजे, संगणक अभियंता
डोळ्यांचे आजार हे संसर्गातून होत असतात. उष्णतेमुळे सतत डोळे कोरडे होतात, डोळे रखरखीत वाटणे, जळजळणे, डोळ्यांमध्ये खाज येणे असे त्रास होतात. या त्रासामुळे मुक्तता मिळवण्यासाठी सर्वसामान्यत: गार पाण्याचा शिडकावा डोळ्यांवर करावा किंवा थंड पाण्याच्या कापडी पट्ट्या डोळ्यावर ठेवाव्या. उन्हामध्ये फिरताना छत्री किंवा टोपी, सनग्लासेसचा वापर करावा. तसेच रात्रीचे जागरण, उशिरापर्यंत टीव्ही बघणे टाळावे.
- डॉ. राधिका परांजपे, नेत्रतज्ज्ञ