अकार्यक्षमतेमुळे उद्यान विभागाची वाट
By admin | Published: September 3, 2016 03:15 AM2016-09-03T03:15:44+5:302016-09-03T03:15:44+5:30
महापालिका उद्यान विभागाच्या कारभारावर स्थायी समितीच्या सभेत सदस्यांनी जोरदार टीका केली. उद्यान विभागातील अधिकाऱ्यांच्या अकार्यक्षमतेमुळे वाट लागली
पिंपरी : महापालिका उद्यान विभागाच्या कारभारावर स्थायी समितीच्या सभेत सदस्यांनी जोरदार टीका केली. उद्यान विभागातील अधिकाऱ्यांच्या अकार्यक्षमतेमुळे वाट लागली आहे, अशी तक्रार केली आहे. उद्यान विभागाच्या वतीने नुसतेच वृक्षारोपण केले जाते. जगतात किती याचे संशोधन करायला हवे, उद्यान अधीक्षकांकडे तक्रार केली, तरी दखल घेत नाहीत, अशी तक्रार केली.
स्थायी समितीच्या सभेत उद्यान विभागाच्या संदर्भात विषय होता. महापालिकेतर्फे करण्यात येणाऱ्या वृक्षारोपण करण्यात येणार असून, चांगल्या प्रजातींच्या रोपांची गरज व आवश्यकता पाहून वृक्षारोपणाची रोपे व फळांची पाहणी करावी. सामाजिक वनीकरण विभागाच्या पुणे, शिरूर, इंदापूर आदी भागातील नर्सरींची पाहणी करणे. तसेच रोपे आणि फळरोपे थेट पद्धतीने खरेदी करण्याच्या सुमारे चार लाखांचा विषय स्थायीसमोर ठेवण्यात आला होता. या वेळी सदस्यांनी उद्यान विभागाच्या कामावर नाराजी व्यक्त केली. टीका केली. नारायण बहिरवाडे म्हणाले, ‘‘दर वर्षी रोपे खरेदीचा विषय स्थायीसमोर येतो. पूर्वी गुलाबपुष्प उद्यान आणि संत तुकारामनगर येथील नर्सरीत रोपे तयार करण्यात येत होती. रोपांची निर्मिती बंद झाली आहे. खरेदीचे विषय आणले जातात.
कैलास थोपटे म्हणाले, ‘‘लहान-मोठ्या सोसायट्यांच्या परिसरात छोट्या वृक्षांची छाटणी करण्याची यंत्रणा पालिकेकडे नाही. त्यामुळे नागरिकांची गैरसोय होत आहे. तसेच काही वेळा धोकादायक झाडांमुळे अपघातांची शक्यता असते. (प्रतिनिधी)