चिखलामुळे घसरुन होताहेत अपघात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 24, 2017 02:42 AM2017-07-24T02:42:44+5:302017-07-24T02:42:44+5:30

एका वाहतूक व्यावसायिकाच्या वाहनामुळे किवळे ते विकासनगर रस्त्यावर चिखलाचा थर निर्माण झाला आहे. चिखलाच्या थरावरून

Due to the muddy collapse of accidents | चिखलामुळे घसरुन होताहेत अपघात

चिखलामुळे घसरुन होताहेत अपघात

Next

लोकमत न्यूज नेटवर्क
किवळे : एका वाहतूक व्यावसायिकाच्या वाहनामुळे किवळे ते विकासनगर रस्त्यावर चिखलाचा थर निर्माण झाला आहे. चिखलाच्या थरावरून दुचाकी व हलक्या मोटारी घसरून अपघात होत आहेत. दहा-पंधरा दिवस उलटल्यानंतरही महापालिकेच्या वतीने रस्त्यावरील चिखल काढण्यासाठी कार्यवाही झालेली नाही. त्यामुळे स्थानिक ग्रामस्थ व वाहनचालकांनी या रस्त्यावरील चिखलाचा थर काढून गैरसोय दूर करावी व अपघात टाळावेत, अशी मागणी केली आहे.
किवळे हद्दीत एका वाहतूक व्यावसायिकाने शेतात सपाटीकरण करून त्या ठिकाणी संबंधित माल वाहतूक करणारी जड व अवजड वाहने उभी केली जात आहेत.
मालवाहू वाहने उभी राहण्याच्या ठिकाणी असणारा चिखल संबंधित वाहनांच्या ये-जा करण्याने वाहनतळावरील चिखल मुख्य वर्दळीच्या विकासनगर-किवळे या रस्त्यावर येत आहे.
या वाहनांच्या टायरला लागून (चिकटून) माती-चिखल वाहनासोबत दूरपर्यंत जात असून, त्यामुळे विकासनगर व रावेतकडे जाणाऱ्या रस्त्याच्या काही भागात, तसेच काही वाहने देहूरोड - कात्रज महामार्गावर जात असल्याने लांबपर्यंत रस्त्यावर चिखल पसरत आहे. या दोन्ही रस्त्यांवर दुचाकी व चारचाकी वाहनांची वर्दळ असते. हा रस्ता चिखलाने व्यापला आहे.

प्रवाशांचा जीव मुठीत

देहूरोडसह, विकासनगर, एमबी कॅम्प, गहुंजे, सांगवडे, साळुंब्रे, दारूंब्रे आदी भागातील शेतकरी, तळवडे आयटी पार्कमधील अभियंते, परिसरातील कामगार व विद्यार्थ्यांना आपली दुचाकी घेऊन दररोज या रस्त्यावरील चिखलातून जीव मुठीत धरून जावे लागत आहे. महापलिकेच्या संबंधित विभागाने रस्त्यावरील चिखलाचा थर काढून टाकण्याबाबत गेल्या पंधरवड्यात काहीही कार्यवाही केली नसल्याने स्थानिक ग्रामस्थ व वाहनचालक त्रस्त झाले आहेत. महापालिका जाणीवपूर्वक दुर्लक्ष करीत आहे का, असा सवाल उपस्थित केला जात आहे.

Web Title: Due to the muddy collapse of accidents

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.