समाजकारणामुळेच राजकारणात
By admin | Published: February 13, 2017 01:44 AM2017-02-13T01:44:30+5:302017-02-13T01:44:30+5:30
लोकप्रतिनिधी हा शोभेसाठी नसून, लोकांच्या सेवेसाठी असतो. आतापर्यंत आम्ही लोकांची विविध कामे करून सेवा केली आहे.
भोसरी : लोकप्रतिनिधी हा शोभेसाठी नसून, लोकांच्या सेवेसाठी असतो. आतापर्यंत आम्ही लोकांची विविध कामे करून सेवा केली आहे. त्यामुळेच आम्ही राजकारणात आहोत, असे मत भोसरी मतदारसंघाचे आमदार महेश लांडगे यांनी व्यक्त केले.
प्रभाग क्रमांक तीन भाजपाचे उमेदवार नितीन काळजे, सुवर्णा बुर्डे, लक्ष्मण सस्ते यांच्या प्रचारासाठी आमदार लांडगे यांच्या उपस्थितीत गंधर्वनगरी, इंद्रलोक कॉलनी, खान्देशनगर, आदर्शनगर, तापकीरनगर या परिसरात पदयात्रा आणि कोपरा सभा पार पडली. त्या वेळी आमदार लांडगे बोलत होते.
आमदार लांडगे म्हणाले, ‘‘आमदार म्हणून निवडून आल्यानंतर मोशी परिसरातील खान्देशनगर, आदर्शनगर या भागात १८ कोटी रुपयांची अंडरग्राउंड केबलची कामे पूर्ण केली. ही कामे करण्यामागचा उद्देश म्हणजे लोकांना त्रासातून बाहेर काढणे होता. भोसरी मतदारसंघात १०० कोटी रुपयांची कामे करण्याची ताकत मला ऊर्जामंत्र्यांनी दिली आणि त्यात यशस्वी झालो. प्रभागाचा विकास करायचा असेल, तर या निवडणुकीत भाजपाला पाठिंबा देऊन महापालिकेत सत्ता द्या.’’ (वार्ताहर)