विद्यार्थी-पालकांच्या अांदाेलनामुळे सीमा भिंतीवरुन शालेय साहित्याचे स्थलांतर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 17, 2018 01:36 PM2018-06-17T13:36:33+5:302018-06-17T13:36:33+5:30
पिंपरी- चिंचवड शहरात नव्याने होणाऱ्या आयुक्तालयासाठी प्रेमलोकपार्क मधील इमारतीची जागा निश्चित केली आहे.येथील विद्यार्थ्यांना पर्यायी जागेची व्यवस्था दळवीनगर येथील नव्याने बांधण्यात आलेल्या इमारतीत केली आहे.मात्र या जागेला पालकांचा विरोध असल्याने आज पालक व विद्यार्थ्यांनी पावसात भिजत पालिका प्रशासनाचा घोषणाबाजी करत निषेध केला.
चिंचवड: आम्हाला आमचीच शाळा हवी आहे.नवीन इमारत ही आमच्यासाठी सुरक्षित नाही.या भूमिकेवर पालक व विद्यार्थी ठाम राहिल्याने पालकांचा विरोध डावलत आज महापालिका प्रशासनाला शालेय साहित्य सीमा भिंतीवरून स्थलांतरित करावी लागले. प्रेमलोकपार्क मधील महात्मा ज्योतीबा फुले ही इंग्रजी माध्यमाची शाळा नव्या आयुक्तालयासाठी स्थलांतरित करण्यात आली आहे. नवीन इमारतीला पालकांचा विरोध असल्याने आज पालक व विद्यार्थ्यांनी पावसात भिजत पालिका प्रशासनाचा घोषणाबाजी करत निषेध केला.
शहरात नव्याने होणाऱ्या आयुक्तालयासाठी प्रेमलोकपार्क मधील इमारतीची जागा निश्चित केली आहे.येथील विद्यार्थ्यांना पर्यायी जागेची व्यवस्था दळवीनगर येथील नव्याने बांधण्यात आलेल्या इमारतीत केली आहे.मात्र या जागेला पालकांचा विरोध आहे.नवीन इमारत ही रेल्वे लाईन जवळ असून येथे गुन्हेगारांचा वावर असतो.मुलांसाठी येथे सुरक्षित वातावरण नसल्याचे सांगत पालकांनी आंदोलन उभे केले आहे. आज रविवार सुट्टीचा दिवस असूनही पालक व विद्यार्थी प्रेमलोकपार्क येथील शाळेसमोर आंदोलन करत होते.शाळेचे साहित्य स्थलांतरीत करण्यासाठी या मुळे अडचणी येत होत्या.पालकांचा विरोध पाहून पालिका प्रशासनाने या इमारतीला सील लावले होते.दळविनगर येथील नवीन इमारतीत शाळा सुरू करण्यात आली आहे.मात्र शालेय साहित्य प्रेमलोक पार्क मधील इमारतीत अडकल्याने आज पोलीस बंदोबस्तात हे साहित्य सीमाभिंतीवरून स्थलांतरित करण्याची नामुष्की पालिका प्रशासनावर ओढवली.
आयुक्तालयासाठी चिंचवड मधील महापालिकेच्या शाळेची इमारत निश्चित करण्यात आल्याने येथे कामाला सुरुवात झाली आहे.शाळेला पर्यायी व्यवस्था करत दळविनगर येथील नवीन इमारतीत शाळा स्थलांतर करण्यात आली. मात्र शाळेच्या पहिल्या दिवशी फक्त बारा विद्यार्थ्यांनी हजेरी लावली.या शाळेतील पालक सहा दिवसांपासून आंदोलन करत आहेत.पालिका प्रशासन,नगरसेवक, राजीकय व सामाजिक कार्यकर्ते,पोलीस प्रशासन यांनी पालकांशी चर्चा केली.मात्र यावर तोडगा निघाला नाही.पालक पालिका प्रशासनाच्या विरोधात घोषणाबाजी करत आहेत.
-------------------------------------
पालकांचा विरोध का ?
पालिका प्रशासनाने दळवीनगरातील नवीन इमारतीत सर्व सोयी सुविधा दिल्या आहेत. रेल्वेलाईन परिसरात व शाळेला सीमाभिंत उभारली आहे.अजून काही सुविधा हव्या असतील तर त्याची दखल घेतली जाईल असे पालिका प्रशासनाकडून सांगण्यात आले आहे. स्थानिक नगरसेवक,शिक्षणमंडळ अधिकारी,आमदार लक्ष्मण जगताप,पक्षनेते एकनाथ पवार या सर्वांनी पालकांना चर्चेतून मार्ग काढता येईल असे सांगितले आहे. मात्र तरीही पालकांचा विरोध कायम असल्याने आता या बाबत उलट,सुलट चर्चा सुरू आहे.