व्हायरल पोस्टमुळे दिव्यांग दाम्पत्याचं जगणं मुश्कील
By admin | Published: July 14, 2017 02:34 PM2017-07-14T14:34:10+5:302017-07-14T14:34:10+5:30
व्हॉट्सअॅपवरील एका व्हायरल पोस्टमुळे पिंपरीतील एका दिव्यांग दाम्पत्याचे जगणे मुश्कील झाले आहे.
Next
ऑनलाइन लोकमत
पिंपरी-चिंचवड, दि. 14 - व्हॉट्सअॅपवरील एका व्हायरल पोस्टमुळे पिंपरीतील एका दिव्यांग दाम्पत्याचे जगणे मुश्कील झाले आहे. व्हायरल पोस्टमधील फोटोत असलेली लहान मुलगी ही पिंपरीतील अजमेरा, मासूळकर कॉलनी येथे दिसली आहे. येथे भीक मागणारे म्हणतात, की ती मुलगी आमची आहे. पण हे पटण्यासारखे नाही.
हा फोटो इतर ग्रुपमध्ये पाठवा. काय माहिती, कुणाची चिमुरडी पुन्हा त्यांना भेटेल’ अशा प्रकारच्या व्हॉट्स अॅपवर व्हायरल झालेल्या या चार ओळींच्या मेसेजमुळे या दिव्यांग दाम्पत्याच्या आयुष्यात वादळ उठले आहे.
पिंपरीत राहत असलेले लोखंडे दाम्पत्याला जन्मतः दृष्टी नाही. चार वर्षांपूर्वी त्यांचा विवाह झाला असून, त्यांना तीन वर्षांची मुलगी आहे. पण ही त्यांची नसल्याचा दावा करणारी पोस्ट कुणी तरी फोटोसहित व्हायरल केली आणि त्यांच्यामागे लोकांचा ससेमिरा सुरू झाला.
दरम्यान, ही मुलगी आमचीच असल्याचे जगाला ओरडून सांगण्याची वेळ या दाम्पत्यावर आली आहे. व्हायरल झालेल्या पोस्टमुळे या दाम्पत्याला मनस्ताप सहन करावा लागत आहे.