टीकेनंतर मुख्यमंत्र्याविना सुरू होणार ई-बस
By ऑनलाइन लोकमत | Published: August 14, 2019 09:23 PM2019-08-14T21:23:24+5:302019-08-14T21:24:14+5:30
पीएमपीच्या ताफ्यातील नऊ मीटर लांबीच्या २५ ई-बस मार्गावर धावत आहेत.
पिंपरी : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते ई-बस आणि सीएनजी बसचे उद्घाटन करण्याचे नियोजन पीएमपीने केले होते. पुणे आणि पिंपरीत टीका झाल्यानंतर मुख्यमंत्र्यांविनाच स्वांतत्र्यदिनापासून बस सुरू करण्यात येणार आहेत.
पीएमपीच्या ताफ्यातील नऊ मीटर लांबीच्या २५ ई-बस मार्गावर धावत आहेत. स्मार्ट सिटी योजनेअंर्तगत एकुण ५०० इलेक्ट्रिक बस येणार आहेत. पहिल्या टप्प्यातील १५० बसपैकी उर्वरीत १२५ बस १२ मीटर लांबीच्या आहेत. त्यापैकी ५० बस ताफ्यात दाखल झाल्या आहेत. केवळ मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते बसचे लोकार्पण व्हावे, असा अट्टाहस पुण्यातील भाजपाचा होता. ह्यलोकार्पणासाठी मुख्यमंत्र्यांची वेळ मिळत नसल्याने नवीन ई-बस, सीएनजी बस मार्गावर येऊ शकणार नाहीत, असे वृत्त लोकमत ने प्रसिद्ध केले होते. उद्घाटनसाठी नागरिकांना वेठीस धरीत असल्याची टीकाही झाली होती. त्यामुळे पीएमपी आणि सत्ताधाºयांवर मोठी टीका झाली होती. त्यामुळे पीएमपीने मुख्यमंत्र्यांची वेळेची वाट न पाहता, उद्घाटन करण्याचा निर्णय घेतला आहे.
पिंपरीत कार्यक्रम
पुणे महानगर परिवहन महामंडळाच्या वतीने पिंपरी चिंचवड भागातील ई-बसेस व सी.एन.जी. बसेस लोकार्पण कार्यक्रम गुरुवारी सकाळी पावणे नऊला डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौक, पिंपरीत होणार आहे. यावेळी महापौर राहूल जाधव यांच्यासह भाजपाचे आमदार आणि महापालिकेतील पदाधिकारी आणि आयुक्त, श्रावण हार्डीकर, पीएमपीच्या अध्यक्षा नयना गुंडे उपस्थित राहणार आहेत.
स्थायी समितीचे सभापती विलास मडिगेरी म्हणाले, १२५ पैकी पन्नास ई-बस आल्या आहेत. २० बस निगडीतील स्थानकात सज्ज आहेत. तसेच सीएनजीच्या एकुण बसपैकी ५७ बस आल्या असून त्यापैपिंपरी-चिंचवड शहरासाठी वीस बस पिंपरी-चिंचवडसाठी असणार आहेत. या बससेवेची सुरूवात गुरूवारी करण्यात येणार आहे.