नदीला प्रदूषणाचे ग्रहण; इंद्रायणीचे झाले गटार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 31, 2018 02:26 AM2018-10-31T02:26:19+5:302018-10-31T02:27:01+5:30

पिंपरी-चिंचवडसह तीर्थक्षेत्र देहू आणि आळंदीतील भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या पवित्र इंद्रायणी नदीला वाढत्या अस्वच्छतेने व प्रदूषणाने अपवित्रतेचे ग्रहण लागले आहे.

Eclipse of river pollution; Indrayani's Drainage | नदीला प्रदूषणाचे ग्रहण; इंद्रायणीचे झाले गटार

नदीला प्रदूषणाचे ग्रहण; इंद्रायणीचे झाले गटार

googlenewsNext

दिघी : पिंपरी-चिंचवडसह तीर्थक्षेत्र देहू आणि आळंदीतील भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या पवित्र इंद्रायणीनदीला वाढत्या अस्वच्छतेने व प्रदूषणाने अपवित्रतेचे ग्रहण लागले आहे. यातून आळंदी येथील नदीवरील पाणीसाठवण के. टी. वेअर बंधाऱ्याची गळती व साठवण बंधारे तुटलेल्या अवस्थेत आहेत. देखभाल दुरुस्तीअभावी पाणी साठवण क्षमतेवर मर्यादा आल्याने आळंदीत इंद्रायणी नदी कोरडी पडली आहे.
पिंपरी-चिंचवड महापालिका हद्दीलगत असलेले आळंदी हे राज्यातील महत्त्वाचे तीर्थक्षेत्र असल्याने येथे वर्षभर भाविक श्रींच्या मंदिरात दर्शनासह तीर्थक्षेत्रातील स्नान महात्म्य जोपासण्यास येतात. पिंपरी-चिंचवड शहर आणि आळंदीतून इंद्रायणी नदी वाहते. मात्र नदीत थेट सांडपाणी सोडले जात आहे. पिंपरी-चिंचवड महापालिका हद्दीतूनदेखील सांडपाण्यावर प्रक्रिया न करता थेट इंद्रायणी नदीत सांडपाणी व रसायन, मैलामिश्रित सांडपाणी सोडले जात आहे. यामुळेदेखील नदीचे प्रदूषण वाढले आहे. वाढत्या जलप्रदूषणाने नाराजी व्यक्त केली जात आहे.

महाराष्ट्र राज्य प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या दुर्लक्षाने इंद्रायणी नदीच्या प्रदूषणात वाढ झाली आहे. नदीतील जलप्रदूषित करणाºया घटकांवर कारवाईच्याअभावी नदी प्रदूषण आळंदीसह नदीच्या परिसरात वाढले आहे. आळंदीला पाणीपुरवठा केंद्रात येणारे पाणीदेखील प्रचंड प्रदूषित असल्याने आळंदी नगर परिषदेस पाणी शुद्धीकरणावर प्रचंड खर्च सहन करावा लागत आहे. आरोग्याची काळजी घेत नागरिकही स्वच्छ पिण्याचे पाण्यास प्राधान्य देत भुर्दंड सोसत आहेत.

आळंदीत येणारे भाविक आणि वारकरी पिंपरी-चिंचवड महापालिका हद्दीत मुक्काम करतात. अशा भाविकांनीही नदीच्या प्रदूषित पाण्यामुळे नाराजी व्यक्त केली आहे. आळंदीत पिण्याच्या पाण्याचे वितरण नलिकांसह पाण्याच्या टाक्यांची कामे देखील झाली आहे. उर्वरित कामे लवकरच होतील. याशिवाय सांडपाणी नलिकांची कामे सुरु आहेत. तीर्थक्षेत्र विकास आराखड्यातील उर्वरित कामे पूर्ण करण्यासाठी आळंदी नगरपरिषदेतर्फे सूचना देण्यात आल्या आहेत. काही कालावधीत तीर्थक्षेत्र आळंदीच्या चेहरामोहरा बदललेला भाविक, नागरिकांना पाहण्यास मिळेल.

इंद्रायणी नदी प्रदूषण रोखण्यासाठी राज्य शासनाच्या माध्यमातून कामकाज सुरु आहे. यासाठी पिंपरी-चिंचवड महापालिकेने डी.पी.आर.देखील तयार केला आहे. राज्य शासनस्तरावरदेखील यासाठी काम सुरु आहे. या कामाला गती देऊन महापालिका प्रशासन आणि लोकप्रतिनिधींनी सकारात्मक भूमिका घेणे आवश्यक आहे. त्यामुळे वारकºयांसाठी पवित्र असलेल्या या नदीचे रुपडे पालटण्यास मदत होईल.

आरोग्य धोक्यात : पाणीही प्रदूषित
पाणीदेखील प्रचंड प्रदूषित असल्याने आळंदी नगर परिषदेस पाणी शुद्धीकरणावर प्रचंड खर्च करावा लागत आहे. भाविक नागरिकांना नाहक जास्त खर्च करून पिण्याचे बाटलीबंद पाणी विकत घ्यावे लागत आहे. आरोग्याची काळजी घेत नागरिकही स्वच्छ पिण्याचे पाण्यास प्राधान्य देत भुर्दंड सोसत आहेत.

Web Title: Eclipse of river pollution; Indrayani's Drainage

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.