विसर्जन मिरवणूक : कलावंतांचा पर्यावरणपूरक संदेश

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 26, 2018 02:24 AM2018-09-26T02:24:56+5:302018-09-26T02:25:16+5:30

पिंपरी शहरातील कला, साहित्य, चित्रपट क्षेत्रातील मान्यवरांनीही गणरायाला निरोप दिला. जल, ध्वनी, वायुप्रदूषणमुक्त आणि पर्यावरणपूरक गणेशोत्सव साजरा करण्याचा संदेश दिला.

eco-friendly message of artists | विसर्जन मिरवणूक : कलावंतांचा पर्यावरणपूरक संदेश

विसर्जन मिरवणूक : कलावंतांचा पर्यावरणपूरक संदेश

googlenewsNext

पिंपरी - शहरातील कला, साहित्य, चित्रपट क्षेत्रातील मान्यवरांनीही गणरायाला निरोप दिला. जल, ध्वनी, वायुप्रदूषणमुक्त आणि पर्यावरणपूरक गणेशोत्सव साजरा करण्याचा संदेश दिला. पिंपरी-चिंचवड या स्मार्ट सिटीत साहित्य, कला, शिक्षण आणि चित्रपट सृष्टीतील मान्यवर वास्तव्यास आहेत. नटरंग फेम सोनाली कुलकर्णी या पिंपरी-चिंचवड नवनगर विकास प्राधिकरणातील निगडी येथे राहतात. सोनाली यांनी आपल्या घरी गणरायाची प्रतिष्ठापना केली होती. रविवारी सकाळी आई सविता, वडील मनोहर, भाऊ आणि सोनाली कुलकर्णी यांनी गणरायाला निरोप दिला.
सोनाली या दरवर्षी आकुर्डीतील गणेश तलाव येथे दरवर्षी गणेश विसर्जन करत असतात. मात्र त्यांनी या वर्षी घरात पर्यावरणपूरक शाडूची मूर्तीची प्रतिष्ठापना केली होती. विसर्जनाच्या दिवशी म्हणजेच रविवारी सकाळी कुटुंबीयांसमवेत गणरायाला निरोप दिला व घरातील हौदात गणरायाच्या मूर्तीचे विसर्जन केले.
सोनाली कुलकर्णी म्हणाल्या, ‘‘गणेशोत्सव दिवसेंदिवस वाढत आहे. पर्यावरणपूरक गणेशोत्सव साजरा करणे ही काळाची गरज
आहे. सर्वांनी पर्यावरणपूरक गणेशोत्सव साजरा करण्यासाठी प्रयत्न करायला हवेत.’’
दरम्यान, अगं बाई अरेच्या फेम प्रियांका यादव या चिंचवड बिजलीनगर येथे राहतात. त्यांनीही गणरायाला निरोप दिला़ तिने बहिणीसमवेत चिचवड स्टेशन
येथील श्री छत्रपती शाहू तरुण मंडळाच्या गणेशोत्सव मिरवणुकीत सहभाग घेतला होता. प्रियांका यादव म्हणाल्या, ‘‘लोकमान्य बाळ गंगाधर टिळक यांनी राष्ट्रीय एकात्मता वाढीस लागावी म्हणून गणेशोत्सवाची सुरुवात केली. उत्सवाचा लौकिक दिवसेंदिवस वाढत आहे. ही आनंदाची गोष्ट आहे.

महापौरांनी टिपली सोहळ्याची क्षणचित्रे
चिंचवडच्या चापेकर चौकात पोलिसांच्या वतीने उभारण्यात आलेल्या स्वागतकक्षात महापौर राहुल जाधव छायाचित्रणाचा आनंद घेताना पाहायला मिळाले. मिरवणुकीची क्षणचित्रे आपल्या कॅमेऱ्यात टिपत होते. अकरा दिवस मनोभावे सेवा केल्यानंतर रविवारी आपल्या लाडक्या बाप्पाला गणेश मंडळांकडून निरोप दिला जात होता. विसर्जन मिरवणुकीत मंडळांनी आकर्षक सजावटी केल्या होत्या. पोलिसांनी उभारलेल्या मंडपात राजकीय मंडळीची गर्दी होती. तर मिरवणूक पाहण्यासाठी रस्त्यांच्या दुतर्फा नागरिकांनी मोठी गर्दी केली आहे. पोलिसांच्या वतीने उभारलेल्या स्वागत कक्षातही गर्दी झाली होती. महापौर राहुल जाधव यांच्या हस्ते गणेश मंडळांचे स्वागत केले. याच ठिकाणी बसून महापौरांना मिरवणुकीची क्षणचित्रे आपल्या कॅमेºयात टिपली.

महापालिकेला स्वागत कक्षाचा विसर
सांस्कृतिक व संस्कृती रक्षणाचे गोडवे गाणाºया पिंपरी-चिंचवड महापालिकेतील सत्ताधारी भाजपाला गणेश फेस्टिव्हल, गणेश सजावट स्पर्धा याचबरोबर गणेशभक्तांचा स्वागत कक्ष उभारण्याचा विसर पडला आहे. सण-उत्सव साजरे करण्यावर स्वायत्त संस्थांना उच्च न्यायालयाने बंधने घातल्याने यंदा चिंचवडगावातील चापेकर चौकात असणारा महापालिकेचा स्वागत कक्ष उभारण्यात आलेला नव्हता. पोलीस आयुक्तालयाने उभारलेल्या स्वागत कक्षातूनच गणेश मंडळांचे स्वागत करण्यात येत होते.

Web Title: eco-friendly message of artists

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.