शिक्षण विभाग ‘आधार’मध्ये निराधार

By Admin | Published: December 29, 2016 03:17 AM2016-12-29T03:17:55+5:302016-12-29T03:17:55+5:30

यशस्वी नियोजन करूनही सरकारने दिलेल्या २५ डिसेंबर या मुदतीमध्ये नोंदणीचे काम पूर्ण करण्यात शिक्षण मंडळास अपयश आले आहे. आधार कार्डची नोंदणी करण्यास

Education Department 'base' baseless | शिक्षण विभाग ‘आधार’मध्ये निराधार

शिक्षण विभाग ‘आधार’मध्ये निराधार

googlenewsNext

पिंपरी : यशस्वी नियोजन करूनही सरकारने दिलेल्या २५ डिसेंबर या मुदतीमध्ये नोंदणीचे काम पूर्ण करण्यात शिक्षण मंडळास अपयश आले आहे. आधार कार्डची नोंदणी करण्यास विलंब होत आहे. आजअखेर सुमारे ८८ हजार १७९ विद्यार्थ्यांची आधारकार्ड नोंदणी बाकी असल्याचे निदर्शनात आले आहे.
सरकारने शालेय विद्यार्थ्यांची आधार नोंदणी करण्याची सूचना सर्व जिल्ह्यांतील शिक्षण विभागांना केली होती. विद्यार्थ्यांचे आधार कार्ड क्रमांक शाळेच्या रजिस्टरला नोंद करण्यात येणार असल्याने बोगस विद्यार्थ्यांची संख्या कमी होण्यास मदत होईल.
या धर्तीवर ंिपंपरी-ंिचंचवड शहरातील खासगी व पालिकेच्या एकूण ६११ शाळांमध्ये तीन लाख ३८ हजार ९२५ विद्यार्थ्यांच्या आधारकार्डाचे काम सुरू आहे. यातील दोन लाख ५० हजार ३८२ विद्यार्थ्यांचे आधार कार्ड नोंदणी झाली आहे. नोंदणीचे काम तत्परतेने व्हावे, यासाठी सप्टेंबरमध्ये शिक्षण मंडळातर्फे बारा विषयतज्ज्ञांची नियुक्ती करण्यात आली. २० केंद्रांची उभारणी करण्यात आली. (प्रतिनिधी)

बंद विद्युतपुरवठा, मुलांचे बोटांचे ठसे न उमटणे व यंत्रातील तांत्रिक बिघाड यांमुळे आधारकार्ड नोंदणीमध्ये अडथळा येत आहे. तरीही लवकरात लवकर नोंदणीचे काम व्हावे यासाठी आमची यंत्रणा जोमाने प्रयत्न करीत आहे.
- बी. एस. आवारी, प्रशासन अधिकारी, शिक्षण मंडळ

Web Title: Education Department 'base' baseless

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.