आठ क्षेत्रीय कार्यालये झाली सज्ज

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 8, 2017 03:16 AM2017-08-08T03:16:14+5:302017-08-08T03:16:14+5:30

पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या सध्या अस्तित्वात असणाºया सहा क्षेत्रीय कार्यालयांत क्रांतिदिनापासून दोन कार्यालयांची भर पडणार आहे. आठ प्रभाग कार्यालये नागरिकांच्या सेवेसाठी उपलब्ध होणार आहेत.

Eight regional offices were commissioned | आठ क्षेत्रीय कार्यालये झाली सज्ज

आठ क्षेत्रीय कार्यालये झाली सज्ज

googlenewsNext

लोकमत न्यूज नेटवर्क
पिंपरी : पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या सध्या अस्तित्वात असणाºया सहा क्षेत्रीय कार्यालयांत क्रांतिदिनापासून दोन कार्यालयांची भर पडणार आहे. आठ प्रभाग कार्यालये नागरिकांच्या सेवेसाठी उपलब्ध होणार आहेत. त्याठिकाणी फर्निचर तयार करणे, कार्यालयात मूलभूत सुविधा देण्याचे काम अंतिम टप्प्यात आले आहे.
पिंपरी-चिंचवड महापालिका क्षेत्रात चार प्रभाग होते, आयुक्त डॉ. श्रीकर परदेशी यांच्या कालखंडात सहा प्रभाग करण्यात आले. महापालिका निवडणुकीनंतर सहाऐवजी आठ प्रभागांची निर्मिती केली आहे.
अ, ब, क, ड, इ, फ, ग, ह ही आठ क्षेत्रीय कार्यालये नऊ आॅगस्टपासून सुरू होणार आहेत. त्याची प्रशासकीय तयारी पूर्ण झाली आहे. नवीन क्षेत्रीय कार्यालयात ग आणि ह क्षेत्रीय कार्यालयांची भर पडली आहे. नवीन कार्यालयांसाठी फर्निचरचा सुमारे वीस लाख रुपये खर्चाचा विषय स्थायी समिती सभेत मंजूर केला होता.
निविदांमधून सर्वात कमी दराच्या तीन निविदा स्वीकारल्या. या तीनही निविदांचे दर अंदाजपत्रकीय दरापेक्षा ४४.८८ इतक्या टक्क्यांनी कमी असून त्यानुसार फर्निचर खरेदीसाठी २० लाख, ११ हजार, ५२० रुपये इतका खर्च मंजूर केला होता. त्यानुसार काम पूर्णत्वास आले आहे.
यासोबतच ग आणि ह दोन्ही क्षेत्रीय कार्यालयासाठी अधिकारी, कर्मचाºयांचीही नियुक्ती करण्यात आली आहे. नव्याने निर्माण करण्यात आलेल्या ‘ग’ आणि ‘ह’ क्षेत्रीय कार्यालयासाठी आयुक्त श्रावण हर्डीकर यांनी अधिकारी आणि कर्मचाºयांची नियुक्ती केली आहे. एलबीटी विभागाचे प्रशासन अधिकारी दिलीप अढारी यांच्याकडे ‘ग’ क्षेत्रीय अधिकारीपदाचा, तर प्रशासन विभागाच्या प्रशासन अधिकारी आशा राऊत यांच्याकडे ‘ह’ क्षेत्रीय अधिकारीपदाचा अतिरिक्त पदभार दिला आहे.
करसंकलन विभागाचे मुख्य लिपिक श्रीकांत कोळप यांच्याकडे ‘ग’ क्षेत्रीय कार्यालयाच्या कार्यालय अधीक्षकपदाची, तर ‘ब’ क्षेत्रीय कार्यालयाचे मुख्य लिपिक बबन पोमण यांच्याकडे ‘ह’ क्षेत्रीय कार्यालयाच्या कार्यालय अधीक्षकपदाची अतिरिक्त जबाबदारी सोपविण्यात आली आहे.

दिलीप आढारी, आशा राऊत यांची नियुक्ती
क्षेत्रीय कार्यालयाची जबाबदारी सहायक आयुक्त दर्जाच्या अधिकाºयांवर सोपविली जाते. महापालिकेत सहायक आयुक्त दर्जाचे अधिकारी कमी आहेत. सहायक आयुक्त म्हणून बढती मिळणार आहे, अशा अधिकाºयांना क्षेत्रीय कार्यालयांची जबाबदारी सोपविण्यात येणार आहे. ‘ग’ क्षेत्रीय अधिकारीपदाचा अतिरिक्त पदभार प्रशासन अधिकारी दिलीप आढारी यांच्याकडे तर ‘ह’ क्षेत्रीय अधिकारीपदाचा अतिरिक्त पदभार प्रशासन अधिकारी आशा राऊत यांच्याकडे देण्यात आला आहे

Web Title: Eight regional offices were commissioned

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.