पिंपरी चिंचवडमध्ये चोरट्यांकडून आठ दुचाकी जप्त; दोन सराईतांना अटक

By नारायण बडगुजर | Updated: January 15, 2025 19:07 IST2025-01-15T19:06:39+5:302025-01-15T19:07:12+5:30

चिखली, पिंपरी, भोसरी, चाकण, शिवाजीनगर, निगडी पोलिस ठाण्यातील नऊ वाहन चोरीचे गुन्हे आरोपींकडून उघडकीस

Eight two-wheelers seized from thieves in Pimpri Chinchwad; Two innkeepers arrested | पिंपरी चिंचवडमध्ये चोरट्यांकडून आठ दुचाकी जप्त; दोन सराईतांना अटक

पिंपरी चिंचवडमध्ये चोरट्यांकडून आठ दुचाकी जप्त; दोन सराईतांना अटक

पिंपरी : वाहन चोरी करणाऱ्या दोघांना पिंपरी-चिंचवडपोलिसांच्या गुन्हे शाखा युनिट एकने अटक केली. त्यांच्याकडून सहा लाख ५५ हजार रुपये किमतीच्या आठ दुचाकी जप्त केल्या. चिखली, पिंपरी, भोसरी, चाकण, शिवाजीनगर, निगडी पोलिस ठाण्यातील नऊ वाहन चोरीचे गुन्हे उघडकीस आले आहेत.

रफिक उमर जमादार (३७, रा. मोशी), नीलेश मनोहर गायकवाड (३०, रा. चिखली) अशी अटक केलेल्यांची नावे आहेत. पोलिस उपायुक्त संदीप डोईफोडे यांनी दिलेल्या माहितीनुसार, चिखली पोलिस ठाण्यात वाहन चोरीच्या एका गुन्ह्याचा समांतर तपास गुन्हे शाखेकडून केला जात होता. चिखली येथील वाहन पोलिस रेकॉर्डवरील गुन्हेगार रफिक जमादार आणि नीलेश गायकवाड यांनी चोरी केले असून त्या दुचाकी विक्री करण्यासाठी केएसबी चौक आणि एमआयडीसी ब्लॉक दोन येथे लपवून ठेवल्या असल्याची माहिती गुन्हे शाखा युनिट एकला मिळाली. त्यानुसार पोलिसांनी दोघांना अटक करत त्यांनी लपवून ठेवलेल्या आठ दुचाकी जप्त केल्या.

गुन्हे शाखा युनिट एकचे पोलिस निरीक्षक सुहास आव्हाड, उपनिरीक्षक शिवाजी कानडे, पोलिस अंमलदार मनोजकुमार कमले, सोमनाथ बोऱ्हाडे, महादेव जावळे, गणेश महाडिक, सचिन मोरे, प्रमोद हिरळकर, प्रमोद गर्जे, अजित रुपनवर, तुषार वराडे, तानाजी पानसरे यांच्या पथकाने ही कामगिरी केली.

Web Title: Eight two-wheelers seized from thieves in Pimpri Chinchwad; Two innkeepers arrested

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.