उद्योगनगरीमध्ये अठरा अनधिकृत खासगी शाळा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 13, 2018 02:54 AM2018-06-13T02:54:08+5:302018-06-13T02:54:08+5:30
शहरात १८ खासगी शाळा अनधिकृतपणे सुरू आहेत. त्यांची यादी पालिकेने नुकतीच जाहीर केली आहे. त्यामध्ये १७ शाळा इंग्लिश माध्यमाच्या शाळा आहेत, तर एक शाळा मराठी माध्यमाची आहे. त्या शाळांमध्ये प्रवेश घेऊ नये, असे आवाहन पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या शिक्षण विभागाच्या प्रशासन अधिकारी ज्योत्स्ना शिंदे यांनी केले आहे.
पिंपरी - शहरात १८ खासगी शाळा अनधिकृतपणे सुरू आहेत. त्यांची यादी पालिकेने नुकतीच जाहीर केली आहे. त्यामध्ये १७ शाळा इंग्लिश माध्यमाच्या शाळा आहेत, तर एक शाळा मराठी माध्यमाची आहे. त्या शाळांमध्ये प्रवेश घेऊ नये, असे आवाहन पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या शिक्षण विभागाच्या प्रशासन अधिकारी ज्योत्स्ना शिंदे यांनी केले आहे. अनधिकृत शाळेत प्रवेश घेतल्यास पाल्याच्या होणाऱ्या शैक्षणिक नुकसानीस पालक जबाबदार राहतील, असेही त्यांनी स्पष्ट केले आहे.
शहरामध्ये काही खासगी प्राथमिक शाळा शासनाची परवानगी न घेता बिनदिक्कतपणे सुरू आहेत. शासनाची कोणतीही परवानगी न घेता या शाळांनी राजरोसपणे व्यवसाय चालवला आहे. या अनधिकृत शाळा बंद करण्यासाठी संबंधित शाळेच्या संस्थांना नोटीसही बजावल्या आहेत. मात्र या नोटिशीकडे दुर्लक्ष करत या शाळा अनधिकृतरीत्या सुरू ठेवण्यात
आल्या आहेत. शहरातील अशा एकूण १८ शाळांची यादी महापालिकेच्या शिक्षण मंडळे नुकतीच जाहीर केली आहे.
शहरातील या अनधिकृत शाळांमध्ये पालकांनी आपल्या पाल्याचा प्रवेश घेऊ नये. या शाळांमध्ये प्रवेश घेतल्यास होणाºया नुकसानीस पालिका प्रशासन जबाबदार राहणार नाही, असे प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात स्पष्ट करण्यात आले आहे. संबंधित अनधिकृत शाळांवर १९ आॅक्टोबर २०१० च्या कायद्यानुसार कारवाईचा इशारा शिक्षण मंडळाने दिला आहे.
यादी उशिरा आल्याने पालक संतप्त
अनधिकृत शाळांची यादी पालिकेने दोन महिन्यांपूर्वीच जाहीर करणे अपेक्षित होते. खासगी प्राथमिक शाळांचे प्रवेश मे महिन्यामध्येच पूर्ण केले जातात. त्यामुळे शाळा सुरू होण्यासाठी चार दिवस बाकी असताना महानगरपालिकेच्या शिक्षण मंडळाने यादी कशासाठी जाहीर केली, असा संतप्त सवाल पालक करीत आहेत.
शहरातील अनधिकृत शाळांची नावे
ग्रँड मीरा इंग्लिश स्कूल (मोशी)
स्मार्ट स्कूल (मोशी प्राधिकरण)
इंद्रायणी इंग्लिश मीडिअम स्कूल (साई पार्क दिघी)
बुद्धिस्ट इंटरनॅशनल इंग्लिश मीडिअम स्कूल (मोशी)
मास्टर केअर इंग्लिश मीडिअम स्कूल (भोसरी आळंदी रोड)
ग्रँड मीरा इंग्लिश
मीडिअम स्कूल (चिखली)
जयश्री इंग्लिश
मीडिअम स्कूल (चºहोली)
मरिअम इंग्लिश
मीडिअम स्कूल (भोसरी)
पर्ल ड्रॉप स्कूल (पिंपळे निलख)
ज्ञानराज प्राथमिक स्कूल (कासारवाडी)
सेंट मेरीज् ज्युनिअर प्रायमरी स्कूल (पिंपळे निलख)
माउंट कारमल पब्लिक स्कूल (सांगवी)
शुभंकरोती इंटरनॅशनल स्कूल (गांधी पेठ,चिंचवड)
एंजल्स प्राथमिक स्कूल
(पिंपळे निलख)
मॉडर्न पब्लिक स्कूल (रहाटणी)
ब्लू रोज इंटरनॅशनल
स्कूल (चिंचवड)
बालगोपाल माध्यमिक शाळा (मराठी माध्यम,पिंपरी)