ज्येष्ठांनी लोकशाही मजबूत करावी

By Admin | Published: January 29, 2017 04:01 AM2017-01-29T04:01:21+5:302017-01-29T04:01:21+5:30

ज्येष्ठ नागरिकांनी निवडणुकीमध्ये मतदानाचा हक्क बजावून लोकशाहीचा धागा अधिक मजबूत करावा, असे आवाहन निवडणूक विभागाचे सहायक आयुक्त डॉ. यशवंतराव माने यांनी केले.

The elders should strengthen the democracy | ज्येष्ठांनी लोकशाही मजबूत करावी

ज्येष्ठांनी लोकशाही मजबूत करावी

googlenewsNext

पिंपरी : ज्येष्ठ नागरिकांनी निवडणुकीमध्ये मतदानाचा हक्क बजावून लोकशाहीचा धागा अधिक मजबूत करावा, असे आवाहन निवडणूक विभागाचे सहायक आयुक्त डॉ. यशवंतराव माने यांनी केले.
पिंपरी-चिंचवड महापालिका सार्वत्रिक निवडणुकीत मतदानाची टक्केवारी वाढविण्यासाठी मतदार जनजागृती मोहिमेंतर्गत शहरातील ज्येष्ठ नागरिकांच्या मेळाव्याचे आयोजन शनिवारी पिंपरीतील येथील आचार्य अत्रे रंगमंदिरात करण्यात आले होते. त्या वेळी ते बोलत होते.
या वेळी सहआयुक्त दिलीप गावडे, सहायक आयुक्त अण्णा बोदडे, अनंत खेळकर, ज्येष्ठ नागरिक महासंघाचे अध्यक्ष प्रभाकर कोळी, कार्याध्यक्ष सूर्यकांत मुथियान, तसेच विश्वास महाजन, वृषाली मरळ, मारुतराव मोरे, हरिनारायण शेळके, रमेश परब आदी उपस्थित होते.
माने म्हणाले, ‘‘आपली लोकशाही सुदृढ व बळकट होण्यासाठी मतदानाची टक्केवारी वाढविणे गरजेचे आहे. यासाठी ज्येष्ठांनी आपल्या परिवारातील, परिसरातील मतदारांना मतदान करण्याविषयी प्रवृत्त करावे. मतदानाची टक्केवारी वाढविण्यासाठी शहरात विविध उपक्रमाद्वारे व माध्यमाद्वारे जनजागृती करण्यात येत आहे. यामध्ये रॅली, पथनाट्य, कार्यशाळा, मेळावे आदीचा समावेश असून यामध्ये ज्येष्ठांनी सहभाग घ्यावा. मतदार व मतदान जनजागृती मोठ्या प्रमाणावर करुन यावेळी मतदानाची टक्केवारी ७० टक्क्यापेक्षा जास्त करावी.’’ निवडणूक निर्भयमुक्त, पारदर्शक व शांततेत पार पाडण्यासाठी सर्वांनी सहकार्य करावे, असे आवाहनही या वेळी त्यांनी केले.
‘माझ्याजवळ बसा अन् खुदकन हसा, जपू लोकशाहीचा वसा’ हा मतदार जनजागृतीपर मनोरंजनात्मक कार्यक्रम सादर करण्यात आला. या वेळी सह आयुक्त दिलीप गावडे, ज्येष्ठ नागरिक महासंघाचे कार्याध्यक्ष सूर्यकांत मुथियान यांनीही मनोगत व्यक्त केले.
प्रास्ताविक अण्णा बोदडे यांनी केले. तर सूत्रसंचालन रमेश भोसले व किशोर केदारी यांनी केले. (प्रतिनिधी)

Web Title: The elders should strengthen the democracy

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.