निवडणूक कार्यालये सज्ज
By admin | Published: January 15, 2017 05:26 AM2017-01-15T05:26:10+5:302017-01-15T05:26:10+5:30
पिंपरी-चिंचवड महानगरपालिका सार्वत्रिक निवडणूक २०१७ साठी निश्चित करण्यात आलेल्या निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांच्या कार्यालयांची पाहणी शुक्रवारी आयुक्त दिनेश
पिंपरी : पिंपरी-चिंचवड महानगरपालिका सार्वत्रिक निवडणूक २०१७ साठी निश्चित करण्यात आलेल्या निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांच्या कार्यालयांची पाहणी शुक्रवारी आयुक्त दिनेश वाघमारे यांनी केली. आढावा घेतला. स्थापत्य विषयक, पाणीपुरवठा व विद्युतसह सर्व सोयी सुविधा उपलब्ध करून देण्याच्या सूचना यावेळी आयुक्तांनी संबंधित अधिकाऱ्यांना दिल्या. निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांची कार्यालये सज्ज झाली आहेत.
पिंपरी-चिंचवड महापालिका निवडणूकीसाठी अकरा निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांसाठी कार्यालये तयार केली असून त्यापैकी भोसरीतील कै. अंकुशराव लांडगे सभागृह, कासारवाडीतील साई शारदा आयटीआय, क प्रभाग क्षेत्रीय कार्यालय, इंद्रायणीनगर, भोसरी बॅडडमिंटन हॉल, सांगवीतील बॅडमिंटन हॉल येथील कार्यालयांची पाहणी आयुक्तांची पाहणी केली. त्यांचे समवेत अतिरिक्त आयुक्त तानाजी शिंदे, सह शहर अभियंता अंबादास चव्हाण, मुख्य माहिती व तंत्रज्ञान अधिकारी निलकंठ पोमण, सहाय्यक आयुक्त यशवंत माने, मिडीया सेलचे प्रमुख आणि सहायक आयुक्त अण्णा बोदडे यांच्या सह कार्यकारी अभियंता सतीश इंगळे, जीवन गायकवाड, प्रमोद ओंभासे, बापू गायकवाड, सुनील पवार आदी अधिकारी उपस्थित होते.
मुलभूत सुविधांची पाहणी
महानगरपालिकेच्या सार्वत्रिक निवडणूक २०१७ साठी एकूण ११ कार्यालये निश्चित करण्यात आली असून एक महिनाभरासाठी ही कार्यालय सुरू राहणार असल्याने आयुक्तांनी या कार्यालयातील मुलभूत सुविधांची पाहणी केली. विज, पाणी, सार्वजनिक स्वच्छतागृहे आहेत किंवा नाहीत, याची माहिती घेतली. तसेच इंटरनेट सुविधांसंदर्भातही आढावा घेतला. त्या सर्व ठिकाणी आवश्यक त्या स्थापत्य विषयक, पाणीपुरवठा व विद्युत सह सर्व सोयी सुविधा उपलब्ध करून देण्याच्या सूचना यावेळी आयुक्त दिनेश वाघमारे यांनी संबंधित अधिका-यांना दिल्या.
सोमवारी निवडणूक निर्यण अधिकारी होणार रूजू
महापालिका निवडणूकीसाठी अकरा निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांची कार्यालयातील काम पूर्णत्वास आले आहे. तेथील खोल्यांमधील कर्मचाऱ्यांची आसन व्यवस्था, टेबल खुर्च्या यांची व्यवस्था केली आहे. तसेच कार्यालयासाठी आवश्यक असणारी स्टेशनरीही पुरविण्याचे नियोजन केले आहे. तसेच निवडणूक निर्णय अधिकारी आणि सहायक निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांचेही कक्ष तयार करण्याचे काम पूर्णत्वास गेले आहेत. येत्या सोमवारी किंवा मंगळवारी या कार्यालयांचे प्रत्यक्ष कामकाज सुरू होणार आहे. तिथे नवीन अधिकारी रूजू होणार आहे. त्यामुळे ही कार्यालये निवडणूकीसाठी सज्ज झाली आहेत.