महावितरणतर्फे मागेल त्याला वीजजोड

By Admin | Published: December 10, 2015 01:11 AM2015-12-10T01:11:55+5:302015-12-10T01:11:55+5:30

पिंपरी-चिंचवड शहरात मागेल त्याला वीजजोडणी देण्यात येणार आहे. गुरुवारी (दि. १०) दोन्ही शहरांत १४ ठिकाणी ही मोहीम राबविली जाणार आहे.

Electricity demand from Mahavitaran | महावितरणतर्फे मागेल त्याला वीजजोड

महावितरणतर्फे मागेल त्याला वीजजोड

googlenewsNext

पिंपरी : पिंपरी-चिंचवड शहरात मागेल त्याला वीजजोडणी देण्यात येणार आहे. गुरुवारी (दि. १०) दोन्ही शहरांत १४ ठिकाणी ही मोहीम राबविली जाणार आहे. याशिवाय वीजयंत्रणेची व नागरिकांच्या तक्रारीनुसार वीजदेयकांची दुरुस्तीची कामेही या वेळी केली जाणार आहेत.
पुणे व पिंपरी-चिंचवड शहरातील महावितरणच्या ९ विभागांतर्गत या कार्यक्रमाची अंमलबजावणी करण्यात येणार आहे. त्यासाठी १४ ठिकाणांची निवड करण्यात आली आहे. त्यानंतर प्रत्येक गुरुवारी अन्य ठिकाणांची निवड करून हा एकदिवसीय त्रिसूत्री कार्यक्रम राबविण्यात येणार आहे. त्या अंतर्गत पुणे शहरातील रामटेकडी परिसर, गाडीतळ (बंडगार्डन), येरवडा परिसर (नगर रोड), शिवणे परिसर (कोथरूड), भिलारेवाडी-कात्रज, गंज पेठ, भवानी पेठ (पद्मावती), इंदिरानगर, पानमळा व परिसर, शंकर मंदिर जनता वसाहत परिसर (पर्वर्ती), खडकी (शिवाजीनगर), मंगळवार पेठमधील मेलवाणी कंपाउंड परिसर (रास्ता पेठ) आणि पिंपरी-चिंचवड शहरातील पिंपरीगाव परिसर (पिंपरी) व महात्मा फुलेनगर (भोसरी विभाग) या ठिकाणी हा कार्यक्रम होणार असल्याची माहिती महावितरणकडून देण्यात आली.
या उपक्रमांतर्गत वीजयंत्रणेच्या दुरुस्ती अभियानात वीजखांब, लघु व उच्च दाबाच्या वीजतारांची दुरुस्ती, सर्र्व्हीस वायर बदलणे, स्पेसर्स बसविणे, झाडाच्या फांद्या तोडणे आदी कामे होतील. वीजदेयकांच्या दुरुस्ती अभियानात वीजग्राहकांच्या तक्रारीनुसार देयके जागेवरच दुरुस्त करणे, वीजमीटरचे रीडिंग होत नसल्यास ते घेणे, सदोष व नादुरुस्त मीटर बदलून देणे, वीजदेयके मिळत नसल्यास ते उपलब्ध करून देणे आदी कामे तर महावितरण आपल्या दारी या उपक्रमात मागेल त्यांना नवीन वीजजोडणी देणे, अशी विविध प्रकारचे कामे करण्यात येणार असून, वीजग्राहकांनी त्याचा लाभ घ्यावा, असे आवाहन महावितरणच्या वतीने करण्यात आले आहे. (प्रतिनिधी)

Web Title: Electricity demand from Mahavitaran

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.