अग्निशामक दलातील कर्मचारी असुरक्षित

By admin | Published: December 10, 2015 01:14 AM2015-12-10T01:14:59+5:302015-12-10T01:14:59+5:30

जवडीतील स्वर्गीय राजीव माहिती-तंत्रज्ञाननगरीतून कोट्यवधी रुपयांचा महसूल शासनास मिळतो. मात्र, येथील अग्निशामक दलाकडे महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाचे दुर्लक्ष होत आहे

Employees in the Fire Brigade Team are unsafe | अग्निशामक दलातील कर्मचारी असुरक्षित

अग्निशामक दलातील कर्मचारी असुरक्षित

Next

पिंपरी : हिंंजवडीतील स्वर्गीय राजीव माहिती-तंत्रज्ञाननगरीतून कोट्यवधी रुपयांचा महसूल शासनास मिळतो. मात्र, येथील अग्निशामक दलाकडे महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाचे दुर्लक्ष होत आहे. विमाकवच नसल्याने दुसऱ्यांचा जीव वाचविणारे अग्निशामक दलाचे कर्मचारी असुरक्षित आहेत. चोवीस तास पिळवून घेतले जात आहे. महामंडळ दाद देईना आणि सरकार निर्णय घेईना, अशी स्थिती कर्मचाऱ्यांची झाली आहे. त्यांनी दाद मागायची कोणाकडे, असा प्रश्न आहे.
हिंजवडी- माण-मारुंजीत टप्पा एक, दोन आणि तीनमध्ये आयटी पार्क विकसित झाला आहे. सुमारे दीड हजार छोट्या-मोठ्या कंपन्या आणि सुमारे सव्वादोन लाख कामगार, संगणक अभियंते या परिसरात काम करतात. फेज एक आणि फेज तीनमध्ये अग्निशामक दलाचे कार्यालय आहे. या दोन्ही ठिकाणी असणाऱ्या पायाभूत सुविधा उपलब्ध आहेत. मात्र, मुनष्यबळ अपुरे आहे. निम्म्याहून कमी असा कर्मचारीवर्ग येथे आहे. याबाबत कामगारांनी रयत कामगार संघटनेच्या वतीने महामंडळ, एमआयडीसीकडे आणि कामगार मंत्र्यांकडे दाद मागितली. मात्र, त्यांना अद्याप न्याय मिळालेला नाही. आग विझविणे, गॅस गळती होणे, बांधकाम पडले, अपघात झाला. त्या वेळी मदतीसाठी या केंद्रातील कर्मचारी जात असतात. आयटी पार्क परिसरात वर्षभरात शंभर एक घटना घडतात. या घटनांमध्ये कमीत कमी वित्तहानी किंवा मनुष्यहानी व्हावी, या दृष्टीने प्रयत्न करण्यासाठी दलाचे कर्मचारी झटत असतात. अग्निशामक दलाचे कार्यालय आहे, म्हणून लाखो कामगार निश्चिंत असतात. मात्र, कर्मचाऱ्यांची संख्या अत्यल्प असल्याने आयटी पार्कमधील लाखो कामगारांचे जीवन धोक्यात घालण्याचे काम महामंडळ करीत आहे.
आयटी पार्कमधील केंद्रात अग्निशमनच्या गाड्या, आग विझविण्यासाठी प्राथमिक स्वरूपाची यंत्रणा येथे उपलब्ध आहे. मात्र, मोठ्या प्रमाणावर लागलेली आग विझविण्यासाठी फायर सूट नाहीत. आयटी इंडस्ट्री असल्याने या ठिकाणी अत्याधुनिक यंत्रणा उपलब्ध करून द्यावी, अशी मागणी होत आहे. आयटी पार्कच्या सुरक्षिततेसाठी सध्या या केंद्राकडे ३५ मीटर आणि ५५ मीटर उंचची शिडी उपलब्ध आहे. साधारणपणे अठरा मजल्यांपर्यंत पोहोचता येते. या परिसरात आता २२ मजल्यांपर्यंत इमारती निर्माण झाल्या आहेत. त्यामध्ये कोणत्याही प्रकारची दुर्घटना झाल्यास ती आटोक्यात आणण्यासाठी सध्या उपलब्ध असलेली शिडी कमी पडत आहे.
महाराष्ट्र शासन, महामंडळ, तसेच इतर अग्निशामक संस्थांच्या नियमाप्रमाणे दैनंदिन काम हे सर्वांसाठी समान आठ तासांचे असले पाहिजे, असा नियम आहे. मात्र, नियम काही कर्मचाऱ्यांसाठी खंडित स्वरूपाचा असेल, असा महामंडळाचा कोणताही नियम नाही. मात्र, कर्मचारी उपलब्ध नसल्याने आठ तासांपेक्षा अधिक काळ राबवून घेतले जात आहे. (प्रतिनिधी)

Web Title: Employees in the Fire Brigade Team are unsafe

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.