महिला सुरक्षा योजना सक्षम करा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 2, 2017 03:12 AM2017-08-02T03:12:30+5:302017-08-02T03:12:30+5:30
महापालिकेच्या महिला व बाल कल्याण समितीने शहरातील महाविद्यालयाच्या परिसरात होणाºया टवाळखोरीविषयी चर्चा करण्यासाठी पोलीस आयुक्तांसमवेत बैठक घेतली होती.
पिंपरी : महापालिकेच्या महिला व बाल कल्याण समितीने शहरातील महाविद्यालयाच्या परिसरात होणाºया टवाळखोरीविषयी चर्चा करण्यासाठी पोलीस आयुक्तांसमवेत बैठक घेतली होती. त्यात महिलांच्या सुरक्षतेसाठी पोलीस यंत्रणेद्वारे विकसीत केलेल्या बडी कॉप, पोलीस काका या सुविधांसह एस. एम. एस़ व मोबाईल अॅप, महिला सुरक्षा समिती या योजना सक्षमरित्या विकसीत कराव्यात, अशा सूचना केल्या. पोलिसांनी महिला सुरक्षेचे अभिवचन दिले.
शहरातील महाविद्यालयांच्या परिसरात होणाºया टवाळखोरीबाबत ‘लोकमत’ने पाहणी केली होती. याची दखल घेत समितीच्या सभापती सुनीता तापकीर यांच्या अध्यक्षतेखाली बैठक झाली. या बैठकीस परिमंडळ तीनचे उपायुक्त गणेश शिंदे, स्थायी समिती सभापती सीमा सावळे, नगरसदस्य सागर अंगोळकर, नगरसदस्या डॉ. वैशाली घोडेकर, योगिता नागरगोजे, सुनीता तापकीर, सोनाली गव्हाणे, चंदा लोखंडे, सुलक्षणा धर, निकिता कदम, रेखा दर्शले, आशा धायगुडे-शेंडगे, पोलीस उपायुक्त गणेश शिंदे, नगरसचिव उल्हास जगताप, सुरक्षा अधिकारी उदय जरांडे, समाजविकास अधिकारी संभाजी ऐवले, सहायक समाजविकास अधिकारी सुहास बहादरपुरे, प्राचार्य शशिकांत पाटील आदी उपस्थित होते. पोलीस यंत्रणेद्वारे महिलांचे संरक्षण सक्षमरीत्या करण्यासाठी तापकीर यांनी पोलीस उपयुक्तांना महिलांचे प्रतिनिधी म्हणून राखी बांधली.
सुनीता तापकीर म्हणाल्या, ‘‘बडी कॉप, पोलीस काका या योजनेची जनजागृती महापालिका व पोलीस यंत्रणे मार्फत पोस्टर, सिटी केबल, वर्तमान पत्रे, प्रसार माध्यमांद्वारे मोठ्या प्रमाणात करण्यात यावी. पोलिसांमार्फत
लेडी पोलीस मार्शल शाळा, महाविद्यलये, कार्यालये आदी ठिकाणी नेमण्यात यावे.’’
स्थायी समिती सभापती सीमा सावळे म्हणाल्या, ‘‘लोकमतने काही दिवसांपूर्वी महाविद्यालयातील टवाळखोरीबाबत आवाज उठविला होता. महापालिका परिसरातील महाविद्यालयांची पाहणी केली होती. ही बाब गंभीर आहे. ही बाब ओळखून पहिल्यांदाच महिला बाल कल्याण समितीमध्ये चर्चा झाली.
माजी महापौर डॉ. वैशाली घोडेकर यांनी पूर्वी अस्तिवात असलेली विशाखा समिती पुन्हा कार्यान्वित करण्यात यावी, अशी मागणी केली. पोलीस उपयुक्त गणेश शिंदे म्हणाले, ‘‘बैठकीत चांगली चर्चा झाली. नागरी सुरक्षिततेबाबत पोलीस दक्ष असतात. महिलांनी सुरक्षिततेबाबत मांडलेल्या महिलांच्या तक्रारींबाबत योग्य ती कार्यवाही करण्यात येईल.’’