निगडीत फुटपाथवर व्यापा-यांचे अतिक्रमण, प्रशासनाचे दुर्लक्ष
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 31, 2018 03:10 AM2018-01-31T03:10:10+5:302018-01-31T03:10:13+5:30
निगडी येथील बहुतांश रस्त्याच्या दुहेरी बाजूस फुटपाथ आहेत. परंतु हे फुटपाथ सध्या हातगाडीधारक व पार्किंगच्या कचाट्यात सापडले आहेत. त्यापैकी ज्या रस्त्यांवर फुटपाथ आहेत, त्यातील अर्ध्या अधिक फुटपाथवर सर्रास पक्की अतिक्रमणे झाली आहेत.
निगडी : येथील बहुतांश रस्त्याच्या दुहेरी बाजूस फुटपाथ आहेत. परंतु हे फुटपाथ सध्या हातगाडीधारक व पार्किंगच्या कचाट्यात
सापडले आहेत. त्यापैकी ज्या रस्त्यांवर फुटपाथ आहेत, त्यातील अर्ध्या अधिक फुटपाथवर सर्रास पक्की अतिक्रमणे झाली आहेत. जे काही फुटपाथ अतिक्रमणांपासून वाचले आहेत, त्यातील बहुतांश वापरण्याजोगे राहिलेले नाहीत.
विशेषत: निगडीकडून त्रिवेणीनगरकडे जाणाºया रस्त्यावर निगडीकडून प्राधिकरणाकडे जाणाºया फुटपाथवर अतिक्रमणे करण्यात आली आहेत. परिणामी, वर्षानुवर्षे निगडीतील वाहतुकीचा कोंडलेला श्वास मोकळा होण्याऐवजी अजूनच कोंडला जात आहे आणि त्याचा नाहक त्रास सामान्य पादचाºयांना होत आहे.
छोट्या-मोठ्या रस्त्यावरील फुटपाथ हा वाहतुकीचा महत्त्वाचा भाग मानला जातो़ मात्र याकडे कायम दुर्लक्ष करण्यात आले. फुटपाथ हा नंतरचा विषय म्हणून प्रशासनाकडून कायमस्वरूपी दुर्लक्षित विषय राहिला आहे. फु टपाथवरील वर्षानुवर्षांच्या पक्क्या अतिक्रमाणांकडे कोणीही लक्ष द्यायला तयार नाही. कधीतरी एखाद्यावेळेस अतिक्रमण विरोधी पथकाची कारवाई झालीच, तर दुसºया दिवशी ह्यजैसे थेह्ण स्थिती झाल्याशिवाय राहात नाही. गर्दीच्या ठिकाणी फुटपाथ आवश्यक असताना हातगाडीधारकांनी रस्त्याच्या कडेला अतिक्रमण केल्याने वाहनचालकांची चांगलीच त्रेधा उडत आहे.
जेथे कुठे फुटपाथ आहेत, यातील बहुतांश फुटपाथवर छोट्या-मोाठ्या टपºया गाड्या, दुकाने सर्रास थाटण्यात आली आहेत. मात्र अगदी दोन्ही बाजूंनी असलेल्या प्रचंड प्रमाणातील अतिक्रमणांनी फुटपाथ अक्षरश: गिळंकृत केले आहेत.
या फुटपाथवर हॉटेल, फळांच्या गाड्या, कपड्यांची छोटी दुकाने, नारळपाण्याच्या गाड्या याबरोबरच चक्क फुटपाथवर किंवा लगतच थाटण्यात आल्याचे स्पष्टपणे दिसून येते. सगळ्यात वाईट म्हणजे फुटपाथवर पूर्णपणे अतिक्रमण आहेच़ शिवाय फुटपाथपासून थेट रस्त्यावर हातगाड्यांची अतिक्रमणे आली आहेत.
निगडी पीएमपी बस स्थानक परिसरातील रस्त्यांच्या कडेला फुटपाथ असून नसल्यासारखे झाले आहे. या भागात फुटपाथ नाहीसा झाल्यामुळे कुठेही वाहने थांबतात़ रिक्षा-खासगी वाहनांची झुंबड असते, त्यामुळे पादचाºयांचे नेहमीच हाल होतात.
चालायचे कसे? : वाहनांच्या पार्किंगसाठी वापर
अनेक भागांमध्ये फुटपाथ असूनही त्यावर चक्क वाहनांचे पार्किंग झाल्याचे दिसून येते. निगडीकडून दुर्गानगर चौक ते त्रिवेणीनगर चौकापर्यंत दोन्ही बाजूस फुटपाथ असून, फुटपाथचा वापर चक्क दुचाकी-चारचाकी वाहनांच्या पार्किंगसाठी होतो़ या रस्त्यावरील फुटपाथवरून एकही माणूस चालत जाऊ शकत नाही, अशी भयंकर स्थिती आहे़ आणि याकडे संबंधित यंत्रणेचे कायमचे दुर्लक्ष आहे.