भविष्यात धोका नको म्हणून कायमचे संपवले! भंगार व्यवसायिकाचा खून करणाऱ्या दोघांना अटक
By रोशन मोरे | Published: October 3, 2023 04:03 PM2023-10-03T16:03:20+5:302023-10-03T16:04:01+5:30
मित्राच्या मदतीने थेट भंगार व्यावसियाकाच्या डोक्यात हातोडी मारून खून केला...
पिंपरी : भंगार घेण्यावरून वाद झाला म्हणून भंगार व्यावसायिकाने मारहाण करण्यास मुले पाठवली. भविष्यात भंगार व्यावसायिकाकडून जीवाला धोका होऊ शकतो म्हणून मित्राच्या मदतीने थेट भंगार व्यावसियाकाच्या डोक्यात हातोडी मारून खून केला. खून झालेल्या व्यावसायिकाचे नाव सिराज खान (४०) असे आहे. ही घटना २९ सप्टेंबरला अरणेश्वर टेकडी, चऱ्होली येथे घडली. या प्रकरणी पोलिसांनी निजाम अहमद अब्दुल हसन खान (वय ४२, रा.चिखली) यांनी चिखली पोलिस ठाण्यात फिर्याद दिली. त्यानुसार पोलिसांनी सीसीटिव्हीच्या आधारे तपास करत संशयित सैफुद्दीन खान (४०,रा.चिखली), मोहम्मद अनिस (३९, रा.गोरेगाव, मुंबई) यांना अटक केले.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सिराज हे बेपत्ता झाल्याची तक्रार त्यांना प्राप्त झाली होती. त्याअनुषंगाने त्यांनी शोध घेतला असता सीसीटीव्हमध्ये सिराज याला दुचाकीवरून बसवून संशयित सैफुद्दीने घेऊन जाताना दिसला. पोलिसांनी त्याला ताब्यात घेत चौकशी केली असता सिराज याने भंगार घेण्याच्या वादातून मारहाण करण्यास मुले पाठवली होती. भविष्यात धोका नको म्हणून आपला मित्र मोहम्मद अनिस याला बोलवून घेत सिराज याच्या खुनाचा प्लॅन केला. २८ सप्टेंबरला सिराय याला संशयितांनी भंगार घेण्याच्या बहाण्याने चऱ्होलीमधील जंगलाच्या भागात घेऊन जाऊन डोक्यात हातोडा घालून केला.
चार तास शोधमोहीम-
संशयितांनी खुनाची कबुली दिल्यानंतर पोलिसांनी सिराजचा मृतदेह शोधण्यासाठी जंगलात गेले. मात्र, सततचा पाऊस असल्याने शोधकार्यात अडथळे येत होते. पोलिसांना तब्बल चार तासांनी कुजलेल्या अवस्थेत मृतदेह आढळून आला.